राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फुटली

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फुटली

या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीची तेरा मतं फुटल्याचं समोर आलंय.

  • Share this:

20 जुलै : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची निकाल आज लागला. रामनाथ कोविंद हे देशाचे नवे राष्ट्रपती ठरले आहे. मात्र, या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीची तेरा मतं फुटल्याचं समोर आलंय.

रामनाथ कोविंद यांना अपेक्षेपेक्षा तब्बल तेरा मतं जास्त मिळाली. याचाच अर्थ काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी मीराकुमार यांना मतदान करण्याऐवजी कोविंद यांना मतदान केल्याचं स्पष्ट झालंय.

महाराष्ट्र विधानसभेतील एकूण २८८ पैकी २८७ मतदारांनी मतदान केलं. कोविंद यांना भाजपची 122 आणि शिवसेनेची 63 आणि अपक्ष मिळून 198 मतं मिळणं अपेक्षित होतं. पण त्यात तेरा मतांची भर पडली कोविंद यांना 208 मतं पडली. तर मीरा कुमार यांना 91 मतं पडणं अपेक्षित असताना त्यांना अवघी 77 मतं मिळाली. कोविंद यांना मतदान करणारे आमदार कोण अशी चर्चा आता सुरू झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2017 08:13 PM IST

ताज्या बातम्या