राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची भाजपला मदत -रवी राणा

विरोधकांची १३ मतं फुटल्याचं समोर आलंय. पण प्रत्यक्षात २२ मतांचं विभाजन झाल्याचा दावा अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2017 06:01 PM IST

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची भाजपला मदत -रवी राणा

21 जुलै : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांची १३ मतं फुटल्याचं समोर आलंय. पण प्रत्यक्षात २२ मतांचं विभाजन झाल्याचा दावा अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केलाय.

या निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेतील एकूण २८८ पैकी २८७ मतदारांनी मतदान केलं. कोविंद यांना भाजपची 122 आणि शिवसेनेची 63 आणि अपक्ष मिळून 198 मतं मिळणं अपेक्षित होतं. पण त्यात तेरा मतांची भर पडली कोविंद यांना 208 मतं पडली. तर मीरा कुमार यांना 91 मतं पडणं अपेक्षित असताना त्यांना अवघी 77 मतं मिळाली. शिवसेनेची पूर्ण मतं भाजपला मिळाली नाहीत. पण काँग्रेस राष्ट्रवादीची मोठ्या प्रमाणात मदत झाल्याचा धक्कादायक खुलासा रवी राणा यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2017 06:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...