आदित्य ठाकरेंना वरळीतून आघाडीचा 'हा' नेता देणार थेट आव्हान!

आदित्य ठाकरेंना वरळीतून आघाडीचा 'हा' नेता देणार थेट आव्हान!

सचिन अहीर हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या कायकर्त्यांचा मोठा गट हा पक्ष सोडून गेलेले नाही. त्या गटाने ही निवडणूक लढवावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे केली होती.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई 02 ऑक्टोंबर : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना वरळीतून कोण लढत देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लगालंय. मनसेने याआधीच वरळीतून उमेदवार देणार नसल्याचे संकेत दिले आहेत. वंचित बहुजन आघाडी तिथे उमेदवार देणार आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांतर्फे वरळीसाठी चाचपणी सुरू असून सुरेश माने यांना आघाडीतर्फे उमेदवारी दिली जाणं हे निश्चित मानलं जातंय. माने हे बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते. नंतर त्यांनी बहुजन सोशलिस्ट रिपब्लीकन पार्टी हा गट स्थापन केला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत या गटाचा समावेश आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरे यांचं पारडं निश्चितच जड असलं तरी त्यांना लढत सोपी करायची नाही असे विरोधी पक्षांचे डावपेच आहेत.

नाराज नाईक कुटुंब भाजपमध्ये राहणार की नाही? संदीप नाईक म्हणतात...

त्यामुळे माने यांच्या नावावर एकमत होणं निश्चित मानलं जातंय. सचिन अहीर हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या कायकर्त्यांचा मोठा गट हा पक्ष सोडून गेलेले नाही. त्या गटाने ही निवडणूक लढवावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे केली होती. आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. स्थानिक राजकारण आणि मतांची गणित याचा विचार करून सुरेश माने यांचं नाव निश्चित समजलं जातंय.

वरळीत दलित आणि बहुजन मतांची टक्केवारीही मोठी असल्याने त्याचा फायदा होण्याची शक्यता राष्ट्रवादीला वाटते. त्यातच माने हे राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर लढण्यास तयार आहेत. या लढतीमुळे आदित्य यांना ही लढत सोपी केली गेली असाही संदेश जाणार नाही असं राष्ट्रवादीला वाटतं.

चंद्रकांत पाटलांची गाडी अडवण्याचा प्रयत्न, कार्यकर्ते आक्रमक

निवडणुकीच्या आखाड्यात उतरणारा पहिला ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणात गेली अनेक दशकं रिमोट कंट्रोल हाती ठेवणाऱ्या ठाकऱ्या घराण्याची तिसरी पिढी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आदित्य ठाकरेंनी स्वत:च याची घोषणा केलीय. शिवसेनेच्या मुंबईत झालेल्या संकल्प मेळाव्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी ही घोषणा केली. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. राष्ट्रवादी नेते सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं आदित्य यांचा मार्ग मोकळा झाला. त्यासाठीच अहिर यांना आपल्याकडे शिवसेनेनं वळवलं अशीही चर्चा आहे. शिवसेनेच्या इतिहासातला हा एक मोठा निर्णय ठरणार आहे.  निवडणुकीच्या राजकारणात मी उतरणार नाही असं बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. मात्र आदित्य ठाकरे यांनी तो संकेत मोडून ते आता थेट विधिमंडळात प्रवेश करणार आहेत.

तिकीट न मिळाल्यामुळे भाजप नेत्याला अश्रू अनावर, भर सभेत ढसा-ढसा रडले

दरम्यान स्वत: संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेत वरळीतून बिनविरोध निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्याचं साकडं घातलंय. त्यामुळे पवार काय निर्णय घेतील त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवसेनेच्या या मेळाव्याला उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. मात्र रश्मी ठाकरे वार्जुन उपस्थित होत्या. आईच कार्यक्रमात मंचावर असल्यानं आपल्याला बोलताना काही सुचत नाही असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 2, 2019, 2:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading