आघाडीसाठी आज बोलणी, 'या' सहा जागांवरून घमासान होण्याची शक्यता

जवळपास अर्ध्या जागांबाबत दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाली असली तरीही काही जागांचा तिढा मात्र कायम आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2018 10:05 AM IST

आघाडीसाठी आज बोलणी, 'या' सहा जागांवरून घमासान होण्याची शक्यता

मुंबई, 2 नोव्हेंबर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आज (शुक्रवार) आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवास्थानी सकाळी 10 वाजता ही बैठक होईल. जवळपास अर्ध्या जागांबाबत दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाली असली तरीही काही जागांचा तिढा मात्र कायम आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची 17 जागांवर सहमती झाली आहे. तर 14 जागांवर आघाडीसाठी इतर मित्रपक्ष आणि काँग्रस- एनसीपी चर्चा करणार आहे. त्यामध्ये काही जागांवर मतभेद पाहायला मिळत आहेत. पुणे, उस्मानाबाद, शिर्डी, नगर, औरंगाबाद, यवतमाळ या सहा जागांबाबत सर्वाधिक गुंता असल्याचं बोललं जात आहे.


पुण्याच्या जागेसाठी चढाओढ

पुणे लोकसभेची जागा ही आघाडीमध्ये पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसकडे राहिली आहे. मात्र आता राष्ट्रवादीकडून या जागेवर दावा सांगितला जातोय. काही दिवसांपूर्वी तर या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचीच चर्चा होती. परंतु मागील बैठकीत आपण लोकसभा लढवणार नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला. असं असलं तरीही आमची या मतदारसंघात ताकद आहे, असं म्हणत अजूनही राष्ट्रवादीकडून या जागेसाठी आग्रही मागणी केली जात असल्याची माहिती आहे.

Loading...


आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखायचे असल्यास आघाडी करणं गरजेचं आहे, हे दोन्ही काँग्रेसचं मत आहे. त्यामुळे निवडणुकीला अजून अवधी असतानाच आघाडीची बोलणी वेग पकडत आहे. त्यामुळे ज्या जागांबाबत मतभेद आहेत, त्यावर चर्चा करून लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न आजच्या बैठकीत होणार आहे.


VIDEO शाहरूख खानच्या वाढदिवसासाठी 'मन्नत' नटली नववधूसारखी!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2018 10:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...