प्रफुल्ल साळुंखे,मुंबई, 4 जानेवारी : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकसभेच्या प्रत्येकी 24 जागा लढवणार हे आता नक्की झालं आहे. तसंच त्यातील दोन्ही पक्ष आता आपल्या वाट्यातून मित्रपक्षांना काही जागा देणार आहेत. राज्यात भाजपविरोधात महाआघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. बऱ्याच बैठकानंतर दोन्ही पक्षांचं आता जागावाटपावर एकमत झालं आहे.
राष्ट्रवादीची तयारी सुरू
काँग्रेससोबत आघाडीची बोलणी पूर्ण झाल्यानंतर आता राष्ट्रवादीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. आपल्या वाट्याच्या 24 जागांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक लवकरच बैठक होत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वा ही बैठक होईल. आघाडीत आपल्याला मिळालेल्या कोणत्या जागा मित्रपक्षांना सोडाव्यात, तसंच कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार प्रभावी ठरेल, यावर राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
आघाडीतील मित्रपक्षांची मागणी
समाजवादी पार्टी मुंबईत एक जागा मागते आहे. त्यामुळे नेमकी कोणती जागा द्यायची यावरू काँग्रेसची गोची झाली आहे. विद्यमान प्रिया दत्त यांची जूनी जागा तर उत्तर मध्य मुंबई लोकसभा जागा समाजवादी पार्टी मागत आहे. तर दुसरीकडे राजू शेट्टी यांना हातकणंगलेसोबत बुलढाणा लोकसभा मतदार संघ हवा आहे, पण त्यास राष्ट्रवादी अनुकूल नाही.
पालघर लोकसभा मतदार संघाची जागा बहुजन विकास आघाडी, भिवंडी इथल्या जागेसाठी मुस्लिम उमेदवार द्यावा याचा विचार करत काँग्रेस स्वत: अथवा समाजवादी पार्टीला देण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात आहे. प्रकाश आंबेडकर सोबत येत असतील तर अकोला लोकसभा त्यांना देण्याबाबत मित्रपक्षात चर्चा केली जाईल.
VIDEO : अमित शहांनी भाजप खासदारांसोबत शेयर केला युतीबाबतचा 'सीक्रेट प्लान'