काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा आघाडीच्या तयारीत, प्रकाश आंबेडकरांनाही निमंत्रण !

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी होईल असे स्पष्ट संकेत काँग्रेसनं दिले आहेत.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2018 06:40 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा आघाडीच्या तयारीत, प्रकाश आंबेडकरांनाही निमंत्रण !

06 फेब्रुवारी : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी होईल असे स्पष्ट संकेत काँग्रेसनं दिले आहेत. तसंच या आघाडीसाठी प्रकाश आंबेडकरांनाही आघाडीचे निमंत्रण देण्यात आलंय.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली.  येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अधिवेशन आणि येत्या निवडणुकीतल्या आघाडीबाबत चर्चा झाली.

काँग्रेस राष्ट्रवादीत कटूता राहिली नसून आता आघाडीबाबत केंद्रीय पातळीवर शिक्कामोर्तब होणं बाकी असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहे. या बैठकीत अधिवेशनात एकत्र येऊन विविध विषयांवर सरकारविरोधात उभे राहण्याबाबत चर्चा झाली.  धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. आघाडीची चर्चा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या स्तरावर होईल अशी माहितीही चव्हाण यांनी दिली. तसंच प्रकाश आंबेडकरांनीही आघाडीत यावं त्यांचं स्वागत आहे. असं निमंत्रणचं चव्हाण यांनी दिलंय.

सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. भविष्यात एकत्र कसे काम करायचे याची चर्चा झाली. दोन्ही पक्षातील नेत्यांमधील कटुता दूर होऊन गोडवा निर्माण झाला आहे असं तटकरे यांनी म्हटलंय.

या बैठकीला राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण असे दिग्गज नेते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2018 06:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...