फोडाफोडीच्या राजकारणाची काँग्रेसलाही धास्ती, शिवसेनेपाठोपाठ आमदारांना हलवलं!

फोडाफोडीच्या राजकारणाची काँग्रेसलाही धास्ती, शिवसेनेपाठोपाठ आमदारांना हलवलं!

जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत रंगशारदा हॉटेलमध्ये थांबण्याचे आदेश शिवसेना आमदारांना देण्यात आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 07 नोव्हेंबर : राज्यात सध्या सत्ता संघर्ष सुरू असल्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेने पाठोपाठ आता काँग्रेसनेही सावध पवित्रा घेत आपल्या सगळ्या आमदारांना मुंबईत बोलावलं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आमदार फुटण्याच्या भीतीने काँग्रेसने हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजप सत्ताा स्थापन करण्यासाठी फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनकडून करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमिवर आपले आमदार सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी मुंबईत बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत रंगशारदा हॉटेलमध्ये थांबण्याचे आदेश शिवसेना आमदारांना देण्यात आले आहेत. मुंबईतले आमदार मात्र इथे राहणार नाहीत अशी माहिती आहे. तर इतर जिह्यातले आमदार मात्र हळूहळू जमायला लागले आहेत. असं असताना भाजप आता काँग्रेस आमदारांच्या संपर्कात असल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसनेही आमदार फुटण्याच्या भीतीने आमदारांना मुंबईत बोलावलं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

राज्यातल्या सत्तास्थापनेचा पेच आता निर्णायक टप्प्यात पोहोचलाय. भाजप आणि शिवसेनेकडून दावे प्रतिदावे केले जाताहेत. मुख्यमंत्रिपदावर बोलणार असाल तरच बोला, नाही तर फोन करू नका. काहीच ठरलं नव्हतं, तर मग चर्चा तरी कशाला करायची असं शिवसेनेनं भाजपला निक्षून सांगितलंय. अशी तणावाची परिस्थिती असताना भाजपने नेते सुधीर मुनगंटीवार हे दररोज पत्रकारांना लवकरच तुम्हाला गोड बातमी मिळेल असं सांगत आहेत. गेले काही दिवस ते गोड बातमी, गोड बातमी असं सांगत आहेत मात्र गोड बातमी काही मिळत नाहीये. त्यावरूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

मोठी बातमी - धक्कादायक! 6 हल्लेखोरांनी चहूबाजूने झाडल्या अंदाधुंद गोळ्या, युवकाचा मृत्यू

थोरात म्हणाले, सत्ता स्थापनेचा जो पोरखेळ सुरू आहे त्याला भाजपच जबाबदार आहे. भाजप साम-दाम-दंड-भेद अशी नीती वापरत काँग्रेसमध्ये फोडाफोडीचा प्रयत्न करातेहत. मुनगंटीवार हे दररोज गोड बातमी मिळेल असं सांगतात. मात्र गोड बातमी मिळत नाहीये. कसली गोड बातमी, भाजपने तर महाराष्ट्राचं मॅटर्निटी हॉस्पिटल केलं अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

भाजपसोबत सत्तास्थापनेबाबत संघर्ष निर्माण झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे भाजपसह इतरही सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची भूमिका समोर आली आहे.

सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यात, आता महाराष्ट्राचं लक्ष पवारांच्या भूमिकेवर

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर अजूनही ठाम आहेत. 'मला स्वतःहून युती तोडायची नाही. भाजपने काय तो निर्णय घ्यावा. लोकसभेवेळी जे ठरलं त्याप्रमाणे व्हावं. भाजप अध्यक्ष अमित शाहा यांच्यासोबत सगळे ठरलं होतं. समसमान वाटप हा फॉर्म्युला होता. युती कायम राहावी हीच इच्छा आहे. मात्र भाजपनं दिलेला शब्द पाळावा. ठरल्याप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे देणार असाल तरच भाजपने फोन करावा,' अशी भूमिका या बैठकीत उद्धव ठाकरेंनी घेतल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे अजूनही मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

इतर बातम्या - मुंबई-पुणे एक्सप्रेसवर ट्रकचा भीषण अपघात, 2 जणांचा जागेवरच मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2019 07:38 PM IST

ताज्या बातम्या