काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने विखेंबद्दल संभ्रम वाढला, घडामोडींना वेग

काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने विखेंबद्दल संभ्रम वाढला, घडामोडींना वेग

विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरवापसीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई, 28 डिसेंबर : काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरवापसीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विखे पाटील आणि काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नुकतीच मुंबईत भेटही झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे विखे पाटील हे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये येण्याचा विचार करत आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'काही नेते पुन्हा काँग्रेस येऊ पाहत आहेत. त्यांचं स्वागत करायला हवं,' अशी प्रतिक्रिया अमित देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे विखे पाटील हे खरोखरच पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यासाठी हालचाली करत असल्याच्या चर्चेला आणखीनच जोर मिळाला आहे. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

'मर्द होतास तर तपास का नाही केला?' केसरकरांच्या आरोपानंतर नारायण राणे भडकले

दरम्यान, नुकतीच नगर जिल्ह्यातील भाजपमधील नाराज माजी आमदार आणि विखे पाटील यांच्यात भाजपा प्रदेशाचे कार्यालयात बैठक झाली होती. या बैठकीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. पराभूत झालेल्या भाजप आमदारांनी विखेंविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यासंदर्भात आज पुन्हा अहमदनगरमध्ये बैठक होणार आहे.

राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे हे जरी भाजपमध्ये असले तरी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आणि विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे या अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे विखे-पाटील आणि काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2019 11:58 AM IST

ताज्या बातम्या