मुंबई, 24 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (pooja chavan) शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राठोड यांची राजकीय कोंडी मोठी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. राठोड प्रकरणावरून महा विकास आघाडीतील नेत्यांनी वेगवेगळी मत व्यक्त केली असली तर काँग्रेसमधील दोन नेत्यांची मतं वेगवेगळी दिसून येत आहेत. त्यामुळे मतभेद आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली हे. या प्रकरणाबाबत प्रश्न विचारला असता पटोले म्हणाले की, संजय राठोड प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी करण्यचे आदेश दिले आहे. सत्य बाहेर आल्यानंतर कारवाई करून अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी मांडली आहे. चौकशीअंती याची संपूर्ण माहिती समोर येईल. त्यानंतर योग्य ती भूमिका घेतील, तूर्तास तरी या प्रकरणावर कारवाई करण्याचे कारण नाही, सध्या मीडिया ट्रायल सध्याल सुरू आहे.'
राठोड यांनी पोहोरादेवी येथे गर्दी केल्यावरून टीका होत आहे. पण भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगाल येथील प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तिथे कुणावर देखील गुन्हा दाखल केला जात नाही, मग इथेच का याची चर्चा केली जाते, असा सवाल देखील पटोले यांनी उपस्थित करत राठोड यांचे समर्थन केले होते.
मात्र काँग्रेसमधील वरिष्ठ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांच्या नाराजीनंतर आज प्रतिक्रियाा देताना राठोड यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राठोड प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलिन होत आहे, असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती.
आज महसूल मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा राठोड प्रकरणावरून नाराजी व्यक्त केली आहे. थोराात यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटले आहे की, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी सांगितले होते की, गर्दी करू नये तरी देखील राठोड यांच्या समर्थकांनी गर्दी केली. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कारवाई केली पाहिजे. एकूणच काँग्रेसच्या नेत्यांची दोन वेगवेगळी परस्पर विरोधातली भूमिका राठोड प्रकरणावरून समोर आली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.