'नरेंद्र मोदी सरकारचं 'बजेट'म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू'

'नरेंद्र मोदी सरकारचं 'बजेट'म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू'

फसव्या घोषणा करतात, विकासदर कमी, वित्तीय तूट वाढली नवा रोजगार तयार होत नाही, विकास ठप्प आहे. बुलेट ट्रेनचा फायदा महाराष्ट्राला काय?

  • Share this:

मुंबई 01 फेब्रुवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकार 2.0चं पहिलं पूर्ण बजेट सादर केलं. आत्तापर्यंतचं हे सर्वात मोठं बजेट भाषण होतं. या आधी जसवंतसिंह यांनी 2003मध्ये 2 तास 13 मिनिचं भाषण केलं होतं. सीतारामण यांनी 11 वाजता भाषण सुरु केलं. हे भाषण पावणे तीन तास चाललं. सरकारचं लक्ष लागलं होतं ते टॅक्सच्या फेररचनेकडे त्यात त्यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिलाय. हे बजेट विकासाला चालना देणारं आहे अशी प्रतिक्रिया सत्ताधारी नेत्यांनी व्यक्त केलीय तर हे बजेट सुमार दर्जाचं आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षांनी व्यक्त केलीय. काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही बजेटवर सडकून टीका केलीय. हे बजेट म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू असल्याची टीका त्यांनी केलीय.

ते म्हणाले, सगळ्यात मोठी निराशा महाराष्ट्र आणि मुंबईची झालीय. मुंबई आणि महाराष्ट्र सगळ्यात जास्त कर देशाला देतो पण मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ठोस काही नाही. ह्या बजेटमध्ये नवीन काही नाही. नवी बाटलीत जुनीच दारू आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणार असं आधी सांगितलेलं, पण त्यासाठी ठोस उपाययोजना नाहीत 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर कृषी विकास दर ११ टक्के असला पाहिजे पण तो फक्त २ टक्क्याच्या आसपास आहे. त्यामुळे ही पोकळ घोषणा असून शेतक-यांची फसवणूकच आहे.

Budget 2020 : 'बजेट'मधल्या या आहेत 15 महत्त्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

5 नविन स्मार्ट सिटीची घोषणा केली पण जुन्या १०० स्मार्ट सिटीच काय झालं? सर्वसामान्य नागरिकांना काय सुविधा दिल्या? ते सांगितलं नाही. अर्थव्यवस्था मोडकळीला आली आहे. अर्थसंकल्प सादर होत असताना शेअर बाजार कोसळला, हे कसलं निदर्शक?

निर्मला सीतारमन यांनी बजेटचं भाषण पूर्ण वाचलं नाही, ‘हे’ आहे कारण

रेल्वे खासगीकरण करणार, LIC ,IDBI तसच करणार दिसत आहे. फसव्या घोषणा करतात, विकासदर कमी, वित्तीय तूट वाढली नवा रोजगार तयार होत नाही, विकास ठप्प आहे. बुलेट ट्रेन फायदा महाराष्ट्राला काय? पण वाटा राज्याचा जास्त घेत आहे त्यामुळे विरोध करणारच.

First published: February 1, 2020, 2:55 PM IST

ताज्या बातम्या