फिल्मसिटीच्या मुद्यावरून काँग्रेस नेत्यांचे योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र, म्हणाले...

फिल्मसिटीच्या मुद्यावरून काँग्रेस नेत्यांचे योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र, म्हणाले...

'योगी आदित्यनाथ यांनी किती ही प्रयत्न केले, तरी मुंबईतील चित्रपटसृष्टी बाहेर जावू शकत नाही'

  • Share this:

मुंबई, 02 डिसेंबर : मुंबईची ओळख असलेली फिल्मसिटी (mumbai film city) उत्तर प्रदेशला हलवण्याची चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशचे (uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath mumbai visit) यासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मनसेपाठोपाठ आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasheb Thorat) आणि ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar shinde) यांनी  योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका केली आहे.

'बॉलिवूड आणि कलाकार यांचे प्रेम मुंबई शहारावर आहे, त्यामुळे ते येथेच राहतील, असा टोला  बाळासाहेब थोरात यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लगावला. तसंच, 'योगी आदित्यनाथ मुंबईतील फिल्मसिटीला उत्तर प्रदेशमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही थोरात यांनी केला आहे.

तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेवर टीका केली आहे.  'योगी आदित्यनाथ यांनी किती ही प्रयत्न केले, तरी मुंबईतील चित्रपटसृष्टी बाहेर जावू शकत नाही' असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहे.

मनसेनं लावले भाजपच्या मुख्यालयाबाहेर होर्डिंग

दरम्यान, फिल्मसिटीच्या मुद्यावरून मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत योगी आदित्यनाथ ट्रायडंट हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. याच हॉटेलच्या खाली मनसेचे घाटकोपर येथील विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना युपीचा "ठग" म्हटले आहे.

'कहा राजा भोज...और कहा गंगू तेली.., कुठे महाराष्ट्राचं वैभव...तर कुठे युपीचं दारिद्र. भारतरत्नं दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपट सृष्टी, युपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्नं.' 'अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला "ठग" असे मजकूर असलेले होर्डिंग योगी आदित्यनाथ थांबलेल्या हॉटेलच्या परिसरात लावले आहे.

तसंच, मुंबई लुटायला आलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा हा मुंगेरीलालचे स्वप्नं' असल्याचा टोलाही या होर्डिंगच्या माध्यमातून मनसेनं लगावला आहे. हेच होर्डिंग भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाबाहेरही लावण्यात आले आहे. त्यामुळे या होर्डिंगवरून नवा वाद पेटण्याची चिन्ह आहे.

Published by: sachin Salve
First published: December 2, 2020, 11:21 AM IST
Tags:

ताज्या बातम्या