कलम 370: काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्यांनी केले भाजप सरकारच्या निर्णयाचं कौतुक

कलम 370: काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्यांनी केले भाजप सरकारच्या निर्णयाचं कौतुक

राज्यसभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाबनवी आझाद यांनी आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. मात्र, कृपाशंकर सिंह यांनी जम्मू-काश्मीरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

  • Share this:

मुंबई, 5 ऑगस्ट- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन सादर राज्यसभेत जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेला कलम 370 हटवण्याची शिफारस केली. या शिफारशीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. यानंतर विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. मात्र, जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी स्वागत केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयावर राज्यसभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाबनवी आझाद यांनी आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. मात्र, कृपाशंकर सिंह यांनी जम्मू-काश्मीरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले आहे. जनतेच्या हितासाठी सत्ताधारी सरकारने चांगला निर्णय घेतला आहे, हे माझे वैयक्तिक मत आहे. भाजपमध्ये जाण्याचा मुद्दा नसल्याचे कृपाशंकर सिंह यांनी सांगितले.

कृपाशंकर सिंह भाजपच्या वाटेवर...

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांना कलिना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाबाबत अर्ज ही केला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे मालाड आमदार असलम शेख शिवसेनेत जाण्याची चर्चा असतानाच शेख यांनी मुलाखतींसाठी आले नाही. यावरून कॉंग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

असलम शेख (मालाड), कृपाशंकर सिंह (कलिना), वर्षा गायकवाड (धारावी), अमिन पटेल (मुंबादेवी) या विधानसभा मुलाखतीतला नेत्यांची पाठ फिरवली. काही नेत्यांनी वैयक्तिक कामामुळे येणे शक्य नसल्याचे कळवले. पण कृपाशंकर सिंग, असलम शेख हे मात्र भाजप, शिवसेनेत जाणार याची जोरदार राजकीय चर्चा असतानाच हे नेते मुलाखतीत गैहजर राहिल्यावरून चर्चेने आणखी जोर धरला आहे.

दरम्यान,आगामी विधानसभा निवडणुकीसाठी टिळक भवन येथे कॉंग्रेस नेते माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या आठवड्यात इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मात्र, मुलाखतीला अनेक नेत्यांची दांडी मारली. त्यात कृपाशंकर सिंह यांचाही समावेश होता. 36 विधानसभा मतदार संघ निवडणूक इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या.

VIDEO: उद्धव ठाकरेंकडून मोदी सरकारचं तोंडभर कौतुक तर विरोधकांना खोचक सल्ला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2019 02:47 PM IST

ताज्या बातम्या