Home /News /mumbai /

'खबरदार! कुणी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर गाठ माझ्याशी आहे'

'खबरदार! कुणी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर गाठ माझ्याशी आहे'

महाराष्ट्रात सरकार स्थिर आहे. कुणी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर खबरदार गाठ माझ्याशी आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.

    मुंबई, 16 जुलै: महाराष्ट्रात सरकार स्थिर आहे. कुणी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर खबरदार गाठ माझ्याशी आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. भाजपचे 105 पैकी काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावं सांगितली तर राज्यात राजकीय भूकंप येईल, असा दावा देखील यशोमती ठाकूर यांनी केला आहे. हेही वाचा...मुंबईत रहिवाशी इमारतीची एक बाजू कोसळली, दोघांचा मृत्यू, मुख्यमंत्री घटनास्थळी नाठाळांच्या माथ्यावर काठी कशी हाणायची याची शिकवण आम्हाला मिळालेली आहे. आमचे कुणी फुटणार नाहीत, याबाबत खात्री आहे. मात्र, आमच्यातील कोणी सोडून गेलं तर त्याला बदडून काढू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान, राजस्थानातील भाजपच्या ऑपरेशन 'लोटस'मुळे सध्या देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावर आता महाराष्ट्रातील नेतेमंडळीही आपली प्रतिक्रिया देत आहेत. कर्नाटक, मध्यप्रदेशनंतर भाजपनं आता राजस्थानात घाणेरडा खेळ सुरू केला आहे. शेणातला किडा जसा शेणात राहतो, अगदी त्याच प्रमाणे भाजप राजकारण करत आहे, अशी घणाघाती टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. भाजपची केंद्रात एकहाती सत्ता असताना देखील ते राज्या असा घाणेरडा खेळ खेळत आहे. राज्यात दिलदार मुख्यमंत्री... भाजपला घोडेबाजाराची सवय आहे, त्यांना पैशाचा उन्मात आहे, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीका केली आहे. हे सर्व राजकीय संस्कृतीच्या विरोधात आहे. मात्र, महाराष्ट्रात राजस्थानसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. राज्याला दिलदार मुख्यमंत्री मिळाला असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार, सोनिया गांधी असल्याने राज्यातील सरकार स्थिर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. हेही वाचा...दिवसा हॉटेलमध्ये काम, रात्री शाळेत अभ्यास, ह्या पठ्ठ्यानं 12 वी मिळवलं घवघवीत यश देवेंद्र फडणवीस विदर्भातील आहेत. मात्र, त्यांना सत्ता नसलेलं सहन होत नाही, अशी टीकाही यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांवर केली.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: BJP, Yashomati thakur

    पुढील बातम्या