ती चूक आता पुन्हा नको.. काँग्रेस नेत्याचा थेट हायकमांडला सल्ला

ती चूक आता पुन्हा नको.. काँग्रेस नेत्याचा थेट हायकमांडला सल्ला

राज्यात सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी दिल्लीत शिवसेनेला पाठिंब्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकमत झाले आहे.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर: राज्यात सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी दिल्लीत शिवसेनेला पाठिंब्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकमत झाले आहे. राज्यात लवकरच महाशिवआघाडी सरकार स्थापन करणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले आहे. यावर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी ट्वीट करून महाशिवआघाडी टीका केली आहे.

'काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात बसपासोबत आघाडी करून काँग्रेसने चूक केली होती.. तेव्हा काँग्रेसला मोठा फटका बसला होता. या धक्क्यातून काँग्रेस अजूनही सावरलेली नाही.. आता महाराष्ट्रात आपण पुन्हा तीच चूक करतोय. शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या नंबरचा पक्ष बनने म्हणजे काँग्रेसला दफन करण्यासारखे आहे. काँग्रेसअध्यक्षा दबावाला बळी पडल्या नाहीत आल्या तर बरं होईल...', असे ट्वीट करून संजय निरूपम यांनी थेट काँग्रेसच्या हायकमांड अर्थात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे.

दरम्यान, राज्यात नव्या सरकारस्थापनेविषयीच्या हालचाली आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काल झालेल्या मॅरेथॉन बैठकीत संभाव्य महाशिवआघाडीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र त्याचवेळी या आघाडीत सत्तास्थापनेच्या नव्या फॉर्म्युल्यावरही चर्चा झाली असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आल्याची चर्चा होती. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत भाष्य केले आहे. सत्तास्थापनेच्या 50-50 फॉर्म्युल्याबद्दल बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रिपदाची पहिली टर्म शिवसेनेला मिळेल, अशी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे साहजिकच दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. सत्तेचे गणित जुळून आल्यास महाराष्ट्रात तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेतूनच तीन तर राष्ट्रवादीकडून एका नेत्याचे नाव चर्चेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 11:15 AM IST

ताज्या बातम्या