निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हादरा, संजय निरुपम यांचा पक्ष सोडण्याचा इशारा

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हादरा, संजय निरुपम यांचा पक्ष सोडण्याचा इशारा

विधानसभा निवडणुकीला आता फक्त काही दिवस राहिले असताना निरुपम यांच्या या बंडामुळे काँग्रेला मोठा हादरा बसलाय.

  • Share this:

मुंबई 03 ऑक्टोंबर : मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी बंडाचा झेंडा फडकवलाय. पक्षनेतृत्वाचं जे माझ्यासोबत वागणं आहे ते योग्य नसून आता जास्त काळ सहन होणार नाही. त्यामुळे पक्षाचा निरोप घेण्याची वेळ आलीय असंही त्यांनी ट्विट करून स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीसाठी मी फक्त एक नाव सुचवलं होतं आणि पक्षाने ते नाकारलं आहे. हे अतिशय चूकीचं असून मी पक्षाच्या प्रचारातही सहभागी होणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीला आता फक्त काही  दिवस राहिले असताना त्यांच्या या बंडामुळे काँग्रेला मोठा हादरा बसलाय. आधीच काँग्रेस पक्षाला गळती लागली होती. त्यामुळे अनेक मोठे नेते पक्षसोडून गेलेत अशी केविलवाणी अवस्था असताना आणखी एका नेत्याने बंड करण्यामुळे चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसे काही महिन्यांपासून संपर्कात, शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

लोकसभा निवडणुकीच्या आधीही संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांच्यात वाद निर्माण झाला होता. पक्षाला आता माझी गरज उरली नाही त्यामुळे काम करण्यात काहीच अर्थ नाही अशी टीकाही त्यांनी केली. निरुपम यांनी थेट पक्ष नेतृत्वावरच आक्षेप घेतल्याने प्रकरण जास्त गंभीर असल्याचं बोललं जातंय.

शरद पवारांचा दावा खडसेंनी फेटाळला; म्हणाले, मी राष्ट्रवादीच्या संपर्कात नाही

कायम वादग्रस्त

निरुपम आणि मिलिंद देवरा यांच्यात अनेक वर्षांपासून वाद होता. निरुपम हे एकाधिकारशाही करतात असा आरोप करत मुंबईतल्या अनेक नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर वाद शमविण्यासाठी निरुपम यांची उचलबांगडी करत मिलिंद देवरा यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही मुंबई काँग्रेसमधला वाद सुरुच असल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान, मिलिंद देवरा यांनी स्वतः दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र या जागेवर शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 3, 2019, 5:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading