काँग्रेसने राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारला!

काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 07:25 PM IST

काँग्रेसने राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारला!

मुंबई, 24 एप्रिल: काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विखे-पाटील यांचा राजीनामा स्वीकारल्याचे म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विखे-पाटील यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहल्याचे सांगितले होते. पण तेव्हा त्यांनी आपण विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले नव्हते. पण आज अशोक चव्हाण यांनी विखे-पाटील यांनी राजीनामा दिला होता आणि तो आज अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारल्याचे सांगितले. याच बरोबर चव्हाण यांनी विखे-पाटील यांनी पक्ष सोडून जाऊ नये असे देखील आवाहन केले आहे.

सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्या पाहता राधाकृष्ण विखे-पाटील फार काळ काँग्रेसमध्ये राहणार नाहीत असे दिसते. गेल्या काही दिवसात त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला गेलाय, अशा शब्दात विखे पाटलांनी घणाघाती टीका केली होती. त्याच बरोबर शिर्डी येथे विखे-पाटील समर्थकांच्या सभा होत आहेत. या सभेतून काँग्रेस उमेदवारांचा पराभव करण्याची भाषा बोलली जात आहे. त्यामुळे विखे-पाटील फार दिवस काँग्रेसमध्ये राहणार नाहीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


VIDEO : 'दार तोडून घरात आले आणि माझ्या भाच्याला, भावजाईला मारलं'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 06:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close