मंत्रिमंडळ विस्तारात पत्ता कट होणार का? पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं हे उत्तर

मंत्रिमंडळ विस्तारात पत्ता कट होणार का? पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं हे उत्तर

'मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षनेतृत्वाच्या पातळीवर निर्णय झालेला आहे. योग्य वेळी ते तो सांगतील.'

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई 24 डिसेंबर : ठाकरे सरकारने नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात दुसरी अग्निपरिक्षा पार केली. आता सगळ्यांना वेध लागले ते मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सगळे आमदार विस्ताराची वाट पाहात असून केव्हा निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हा विस्तार हा तिनही पक्षांचा मिळून होणार असल्याने त्याला वेळ लागतोय अशी माहिती आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबात तासभर चर्चा केली. काँग्रसकडून पृथ्विराज चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नाही अशी चर्चा आहे. त्यांना पक्षातच मोठं पद दिलं जाऊ शकते असं म्हटलं जातंय. मंत्रिमंडळ विस्तारातून पत्ता कापला जाणार का? या चर्चेला पृथ्वीराज चव्हाणांनीच उत्तर दिलंय.

मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये तासभर चर्चा

ते म्हणाले, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. पक्ष योग्य तो निर्णय घेईल. आमच्यात पदांसाठी वाद नाहीत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षनेतृत्वाच्या पातळीवर निर्णय झालेला आहे. योग्य वेळी ते तो सांगतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी पक्षातील नेते शपथविधी  लवकर घ्यावा यासाठी आग्रही आहेत, पण सेनेकडून काँग्रेस वाट पाहवी त्यानंतर निर्णय घेऊ अस सांगण्यात येत आहे. काँग्रेस कडून दुपारीपर्यंत शपथविधी बाबत निरोप दिला जाईल अशी माहिती आहे.

तुर्तास प्रोटोकाॅल, सामान्य प्रशासन विभागात शपथविधी बाबत कोणतीही अंतिम निरोप नाही अशी माहिती राजशिष्टाचार विभागाने दिली आहे. राज भवनने ही शपथविधी बाबत अद्याप निरोप नसल्याचे सांगितले आहे. अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम यांची नावे मंत्रीमंडळ समावेश यासाठी चर्चेत आहेत.

अमृता यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेश जबाबदारी कायम ठेवायची की पृथ्वीराज चव्हाण यांना नेमायचे याबाबत अजून अंतिम निर्णय अपेक्षित आहे. शपथविधी उद्या करायचा की नाही तसच करायचा झाल्यास साध्या पद्धतीनेच करावा, देशात आंदोलन सुरू आहे अशी भूमिका काँग्रेस हायकमांड नेत्यांची असल्याची माहिती

 

First Published: Dec 24, 2019 06:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading