• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 'त्या' पत्रावरून नाना पटोलेंनी राज्यपालांवर घणाघाती टीका, म्हणाले...

'त्या' पत्रावरून नाना पटोलेंनी राज्यपालांवर घणाघाती टीका, म्हणाले...

राज्यपाल हे भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यासारखे वागत आहे. पण राज्यपाल हे संवैधानिक पद आहे'

 • Share this:
  मुंबई, 30 जून: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी महाविकास आघाडी सरकारला विधानसभा अध्यक्षाबद्दल (Assembly Speaker) पत्र लिहिले आहे. मात्र,  'राज्यपाल यांचे कार्यालय हे भाजपचे कार्यालय झाले आहे. राज्यपालांच्या सांगण्यावरून विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लावली जात आहे हे सांगण्याचे काम भाजप करत आहे' अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिलं होतं. या निवेदनातील मुद्दे महत्त्वाचे आहे असं म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. या पत्रावरून नाना पटोले यांनी राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. अमृता खानविलकरची हेल्दी रेसिपी; VIDEO पाहूनच तोंडाला सुटेल पाणी 'राज्यपाल यांचे कार्यालय हे भाजपचे कार्यालय झाले आहे. असं प्रथमच देशात असे झाले आहे. राज्यपाल हे भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यासारखे वागत आहे. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे, त्याचा सन्मानच आहे. पण राज्यपालांचे काम काय असते हे मला सांगायची गरज नाही' असा खोचक टोला नाना पटोलेंनी लगावला. 'राज्यपालांच्या सांगण्यावरून विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लावली जात आहे हे सांगण्याचे काम भाजप करत आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवड या विधिमंडळ अधिवेशनात होणार आहे. काँग्रेसमध्ये कुठलीही अंतर्गत नाराजी नाही. येत्या 5 तारखेला विधानसभा अध्यक्षाच्या नावाची घोषणा होईल' असंही पटोले म्हणाले. धावत्या रेल्वेतून उतरणाऱ्या प्रवाशाच्या मदतीला धावला जवान, घटनेचा थरारक VIDEO 'मी मंत्रिपदाची मागणी केली नाही. जी जबाबदारी देतील ते पार पाडेल. माझ्यावर कोणताही मंत्री नाराज नाही. महाविकास आघाडी मध्ये कुठलीही नाराजी नाही. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल भेट घेतली अधिवेशन आणि बाकी विषयांवर चर्चा झाली' असंही नानांनी सांगितलं. 'आम्ही स्वबळाची नारा आधीच दिला आहे. कोणी स्वबळावर कुठे लढत आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. काँग्रेसचाच विधानसभा अध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे' असंही नाना पटोले यांनी ठणकावून सांगितलं.
  Published by:sachin Salve
  First published: