भाजप-शिवसेनेच्या सत्ता संघर्षात 'काँग्रेस'ची उडी, या नेत्यानं केलं मोठं वक्तव्य

भाजप-शिवसेनेच्या सत्ता संघर्षात 'काँग्रेस'ची उडी, या नेत्यानं केलं मोठं वक्तव्य

राज्यपालांनी महाआघाडीला निमंत्रण द्यायला हवे. त्यावेळी शिवसेनेने पाठिंबा दिल्यास आम्ही सरकार स्थापन करू

  • Share this:

मुंबई, 10 नोव्हेंबर: राज्यात सत्तास्थापनेबाबत शिवसेना-भाजपमधील संघर्ष शिगेला पोहोचला असताना आता याते काँग्रेसने उडी घेतली आहे. एकीकडे भाजपला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले असताना दुसरीकडे शिवसेना मात्र शड्डू ठोकून बसली आहे. त्यात काँग्रेसचे नेता आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवले आणि त्यावेळी शिवसेनेने पाठिंबा दिला तर काँग्रेस याबाबत विचार करेल, असे मिलिंद देवरा म्हणाले आहे. मिलिंद देवरा यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

13 व्या विधानसभेची मुदत शनिवारी संपुष्टात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकार स्थापण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपची सत्ता स्थापन करण्याची तयारी आहे का, असे विचारणा करणारे पत्र राज्यपालांनी शनिवारी भाजपला पाठवले आहे. त्यानंतर राजकीय हलचालींना वेग आला आहे. भाजप सत्तास्थापन करण्यात अपयशी ठरल्यास राज्यपालांनी महाआघाडीला निमंत्रण द्यायला हवे. त्यावेळी शिवसेनेने पाठिंबा दिल्यास आम्ही सरकार स्थापन करू, असेही मिलिंद देवरा यांनी सांगितले आहे.

भाजपच्या विरोधात मतदान करेल राष्ट्रवादी..

भाजपची सत्ता स्थापन झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते, मुंबई अध्यक्ष आणि आमदार नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांची शरद पवारांच्या उपस्थितीत 12 नोव्हेंबरला मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली असल्याची देखील मलिक यांनी महिती दिली. राज्यात सत्तास्थापनेसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियमाप्रमाणे राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला निमंत्रण दिले आहे. याचे पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी मत व्यक्त केले आहे. राज्यपालांनी भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे की नाही याची खात्री करून घ्यायला हवी, असे नवाब मलिक यावेळी म्हणाले.

राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. जी प्रक्रिया आता सुरू झाली ती अगोदर होऊ शकत होती. घोडेबाजार सुरू होऊ नये यासाठी राज्यपालांनी लक्ष दिले पाहिजे. भाजपाची सत्ता स्थापन झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल. पटलावर सरकार पडल्यानंतर शिवसेनेने त्यांच्याविरोधात मतदान केले आणि पटलावर सरकार पडले तर पर्यायी सरकार निर्माण करण्याबाबत पक्ष विचार करू शकतो, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 11:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading