काँग्रेसचा दिग्गज नेता भाजपच्या संपर्कात, मुंबईत मोठा धक्का?

काँग्रेसचा दिग्गज नेता भाजपच्या संपर्कात, मुंबईत मोठा धक्का?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आणि आमदार भाजपच्या मार्गावर असल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 1 जून : लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आणि आमदार भाजपच्या मार्गावर असल्याचं बोललं जात आहे. अशातच आज मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांची गुप्त भेट घेतली आहे.

कृपाशंकर सिंह आणि प्रसाद लाड यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र येणारी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पुनर्वसनासंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. आमदार प्रसाद लाड यांच्याकडून मात्र ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पण, त्यानंतर देखील काँग्रेसमधील मतभेद काही संपताना दिसत नाहीत. पराभवानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गजांनी पाठ फिरवली होती.

पराभवावर विचारमंथन करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी बैठक बोलावली. या बैठकीला संजय निरूपम, प्रिया दत्त आणि उर्मिला मातोंडकर या पराभूत उमेदवारांनीच पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं होतं. मुंबईतील पक्ष कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आली होती. तर, एकनाथ गायकवाड हे एकमेव नेते या बैठकीला हजर होते.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय निरूपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आलं होतं. त्यामुळे संजय निरूपम नाराज होते. शिवाय, निवडणुकीच्या काळात देखील काँग्रेसमधील गटबाजी समोर आली होती. त्याचा परिणाम हा निकालांवर देखील झाला.

VIDEO: मोदींनी सत्ता काबीज केल्यानंतर ओवेसींचा पहिला शाब्दिक हल्ला, म्हणाले...

First published: June 1, 2019, 11:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading