'मला पालकमंत्रिपद नको', बाळासाहेब थोरातांची उद्धव ठाकरेंकडे विनंती

'मला पालकमंत्रिपद नको', बाळासाहेब थोरातांची उद्धव ठाकरेंकडे विनंती

महिनाभराहून अधिक काळ गेल्यानंतर सरकारमधील सर्व वाटाघाटी संपल्या आणि पालकमंत्र्यांचीही घोषणा करण्यात आली.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई, 9 जानेवारी : नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखील महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. मात्र त्यानंतरही सत्तेतील नाट्य काही संपलं नाही. आधी मंत्रिमंडळ विस्तारावरून आणि त्यानंतर खातेवाटप आणि पालकमंत्रिपदांवरून चर्चेचं मोठं गुऱ्हाळ चाललं. अखेर महिनाभराहून अधिक काळ गेल्यानंतर सरकारमधील सर्व वाटाघाटी संपल्या आणि पालकमंत्र्यांचीही घोषणा करण्यात आली. मात्र कोल्हापूरचे पालकमंत्रिपद मिळालेल्या बाळासाहेब थोरात यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कोल्हापूरचं पालकमंत्रिपद घेणार नाहीत. यासंदर्भात ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवणार आहेत. तसंच या पत्राद्वारे ते कोल्हापूर पालकमंत्री पद अन्य कोणास द्यावे अशी विनंती करणार आहेत. 'मी आधीच जाहीर केले होते त्यानुसार पालकमंत्री पद घेणार नाही, हे पालकमंत्री पद काँग्रेस पक्षातील अन्य मंत्र्याला देण्याबाबत आग्रही भूमिका मांडू,' असं थोरात यांनी सांगितलं आहे.

फडणवीस आणि राज ठाकरे भेटीवर अजित पवारांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

'मी खूप सीनिअर आहे. जिल्ह्यात अनेक आमदार आणि मंत्री आहे. त्यांना संधी दिली पाहिजे. मी नगर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद जरी स्वीकारलं नाही तरी पालक आहे, अशी भूमिका यापूर्वीच बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केली होती. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोरात यांच्यावर कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी टाकली. मात्र बाळासाहेब थोरात हे आपल्या निर्णयावर ठाम असून ते याबाबत उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवणार आहेत.

जिल्हा परिषदांवर कुणी मारली बाजी? ग्रामीण भागात भाजपसाठी धोक्याची घंटा

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

1. पुणे- अजित अनंतराव पवार

2. मुंबई शहर-. अस्लम रमजान अली शेख

3. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे

4. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे

5. रायगड - आदिती सुनिल तटकरे

6. रत्नागिरी- अनिल दत्तात्रय परब

7. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत

8. पालघर- दादाजी दगडू भुसे

9. नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ

10. धुळे- अब्दुल नबी सत्तार

11. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी

12. जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील

13.अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ

14. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

15. सांगली- जयंत राजाराम पाटील

16. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

17. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

18.औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई

19. जालना- राजेश अंकुशराव टोपे

20. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

21. हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड

22. बीड- धनंजय पंडितराव मुंडे

23. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण

24. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख

25. लातूर- अमित विलासराव देशमुख

26. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)

27. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

28. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई

29. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

30. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड

31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत

32. वर्धा- सुनिल छत्रपाल केदार

33. भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

34. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख

35. चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार

36. गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2020 09:07 AM IST

ताज्या बातम्या