भाजपच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेस आक्रमक, फडणवीसांवर केली घणाघाती टीका

भाजपच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेस आक्रमक, फडणवीसांवर केली घणाघाती टीका

काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राज्यातील नेत्यांना शत प्रतिशद भाजपसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्यानंतर आता राज्यातील राजकारण तापलं आहे. काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'भाजपाने स्वबळावर लढवून दाखवावे... त्यांचा आमदारांचा आकडा खाली जाईल,' अशी टीका थोरात यांनी केली आहे.

महाविकास आघाडीची तीन वेगवेगळी चाके वेगवेगळ्या दिशेला धावतात, अशी टीका भाजपने राज्य सरकारवर केली होती. त्या टीकेवर उत्तर देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'त्यांनी स्वप्न बघावी, त्यांना कोणी बंदी घालू शकत माही. आम्ही महाविकास आघाडी एकत्रित निर्णय घेतो, समन्वय चांगला आहे. आमचे सरकार यशस्वी होत आहे.'

'एनडीआरएफ जे निधी द्यायचा तो केंद्राने दिला, बाकी राज्य सरकारला इतर निधी दिला नाही. देवेंद्र फडवणीस खोटे बोलतात. राज्य सरकारला शरद पवार यांचं मार्गदर्शन आहे, तर सरकार ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली चालले आहे,' असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

राज्यात सत्तास्थापनेसाठी काय आहे भाजपची नवी मोहीम?

'शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या स्वार्था करता एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केले आहे. येणाऱ्या काळात कुणाचाही मदत न घेता सत्तेत येण्यासाठी तयारी करा', असे आदेशच भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहेत.

भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला आज सुरुवात झाली. कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्हर्च्युअली घेण्यात आली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेते हजर होते. यावेळी अध्यक्ष जेपी नड्डांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राज्य सरकारवर सडकून टीका केली.

Published by: Akshay Shitole
First published: July 27, 2020, 4:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading