मुंबई, ३० जून : महाविकास आघाडी सरकार (mva government) कोसळल्यानंतरही काँग्रेसची धुसफूस अजूनही सुरूच आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामकरण संभाजीनगर (Aurangabad renamed as Sambhajinagar) करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.
उद्धव ठाकरेे यांनी बुधवारी राजीनामा देण्याआधी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामाकरणाचा निर्णय जाहीर केला आहे. पण, या निर्णयावरून काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. विधिमंडळात कक्ष क्र 126 या पक्ष कार्यालयात बैठक पार पडली. काँग्रेसचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतरच्या भूमिकेवर महत्वपूर्ण चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नामकरण निर्णयांवर, काँग्रेसच्या गोटात अंतर्गत नाराजी आहे. तसंच, विधानसभा आणि विधानपरिषद, विरोधी पक्षनेते पदावरील पक्षाची भूमिका काय असणार आहे यावर चर्चा झाली.
या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण, सुनील केदार,यशोमती ठाकूर,विश्वजित कदम, सतेज पाटील, नाना पटोले सर्व काँग्रेस नेते हे उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन एक वाजता भेट घेणार आहे.
16 आमदारांना उपाध्यांनी दिलेली नोटीस जिवंत आहे. 11 जुलैपर्यंत त्यांना खुलासा द्यावाच लागणार आहे. तोपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी होणार नाही, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
तसंच, सर्वधर्मसमभाव ही काँग्रेसची भूमिका आहे. नामकरण मुद्द्यांवर थोडीफार नाराजी आहे. मात्र त्यांना समजावून सांगणार आहे, संभाजी महाराज हे महाराष्ट्रासाठी आदरणीय आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.
तर, आज विधिमंडळ बैठक झाली. सर्व आमदार आले होते. पुढील चर्चा केली आम्ही आता विरोधी पक्षात आहोत. ती भूमिका चांगल्या पद्धतीने करायची आहे. लोकशाहीत जी भूमिका येईल ती चांगल्या पद्धतीने करायची आहे. सत्ता असताना काम व्हायची, आमच्यामध्ये कोणतीही नाराजी नाही. आम्ही सगळे उद्धव ठाकरे यांना भेटायला जात आहोत, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारनं शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला (Aurangabad renamed as Sambhajinagar) मंजुरी दिली. ठाकरे सरकारनं शेवटच्या दिवशी घेतलेल्या या निर्णयाचे महाविकास आघाडी सरकारमध्ये पडसाद उमटण्यास सुरूवात झालीय. काँग्रेसपक्षतून या निर्णयाला तीव्र विरोध होतोय. औरंगाबादच्या 200 काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर झाल्यामुळे हे राजीनामे देण्यात आलेत. शहराध्यक्ष,अल्पसंख्याक सेल अध्यक्ष, माजी शहराध्यक्ष यांच्यासह 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. शहराच्या नामांतराचा मोठा फटका काँग्रेसला बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.