Home /News /mumbai /

काँग्रेसची जम्बो कार्यकारणी जाहीर, सातव यांच्या पत्नींना मोठी जबाबदारी, तर आशिष देशमुखांना संधी

काँग्रेसची जम्बो कार्यकारणी जाहीर, सातव यांच्या पत्नींना मोठी जबाबदारी, तर आशिष देशमुखांना संधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जम्बो कार्यकरणी अखेर जाहीर झाली आहे. यामध्ये काँग्रेसच्या प्रत्येक मोठ्या नेत्यांच्या जवळच्या निकटवर्तीयांची वर्णी लागली आहे.

    मुंबई, 26 ऑगस्ट : आगामी स्थानिक स्वराज निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काँग्रेसने सुद्धा कंबर कसली असून काँग्रेसच्या नव्या कार्यकारणी (Congress executive committee) जाहीर केली आहे. दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ.प्रज्ञा सातव (Dr. Pragya satav) यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिले आहे. तर, क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यावर लेटर बॉम्ब फोडणाऱ्या आशिष देशमुखांनाही (ashish deshmukh) संधी देण्यात आली आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जम्बो कार्यकरणी अखेर जाहीर झाली आहे. यामध्ये काँग्रेसच्या प्रत्येक मोठ्या नेत्यांच्या जवळच्या निकटवर्तीयांची वर्णी लागली आहे. 18 उपाध्यक्ष 65 जनरल सेक्रेटरी, 104 सेक्रेटरींची यादी प्रसिद्ध केली आहे. Tokyo Paralympics मध्ये सहभागी झाले पहिले IAS अधिकारी, जिद्द पाहून सलाम कराल! काँग्रेसचे नेते माणिक जगताप यांचं निधन झालं आहे. त्यांच्या जागी त्यांच्या मुलीला संधी देण्यात आली आहे. तसंच काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव (rajiv satav) यांच्या पत्नीला काँग्रेस कार्यकरणीत स्थान देण्यात आले आहे. डॉ.प्रज्ञा सातव यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्याविरोधात लेटर बॉम्ब टाकणारे नेते आशिष देशमुख यांना सुद्धा या कार्यकारणीत जागा देण्यात आली आहे.  देशमुख यांना जनरल सेक्रेटरीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. चीनविरोधात पुरावा सापडला? अमेरिकेच्या हाती लागला कोरोनाच्या स्रोताचा रिपोर्ट तर, वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे भाऊ आणि आमदार धीरज देशमुख जनरल सेक्रेटरीपदाची संधी देण्यात आली आहे. शैलेश शिवराज पाटील चाकूरकर माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांचे चिरंजीव असून त्यांना जनरल सेक्रेटरी म्हणून जबाबदारी दिली आहे. तर, काँग्रेसचे फायरब्रँड प्रवक्ते सचिन सावंत यांकडे जनरल सेक्रेटरीपद देण्यात आले आहे. तर सचिन गुंजाळ यांच्याकडे सचिवपद देण्यात आले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या