Home /News /mumbai /

मोठी बातमी, काँग्रेसचे नाराज आमदार थेट अजित पवारांच्या भेटीला

मोठी बातमी, काँग्रेसचे नाराज आमदार थेट अजित पवारांच्या भेटीला

आपल्या मतदारसंघात निधी वाटपावरून काँग्रेसचे आमदार नाराज असल्याचे समोर आले आहे.

मुंबई, 25 ऑगस्ट : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तिन्ही पक्षांमध्ये या ना त्या कारणावरून अनेक वाद समोर आले होते. आता पुन्हा एकदा काँग्रेसचे आमदार नाराज असल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे नाराज आमदार थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले आहे. काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी तीन दिवसांपूर्वी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर आज कैलास गोरंट्याल हे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले आहे.  अजित पवार यांनी आपल्या दालनात कैलास गोरंट्याल यांना भेटीसाठी बोलावले आहे. त्यांनी समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, शिवसेनेच्या मंत्र्याने घेतली फडणवीसांची भेट कैलास गोरंट्याल यांनी तीन दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून काँग्रेसच्या 11 आमदारांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप करून  सरकारला घरचा अहेर दिला होता. नगरविकास खात्याकडून काँग्रेस आमदारांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकांना निधी देण्यात भेदभाव करण्यात येत आहे. काँग्रेसचे वरीष्ठ आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही बाब घातली, अशी माहितीही आमदार कैलास गोरंटयाल यांनी दिली. गेल्या 8 महिन्यांपासून नगरविकास खात्याने जालना नगरपालिकेला दमडीचेही पैसे दिले नाहीत. माझ्यासारख्या काँग्रेसच्या 11 आमदारांच्या ताब्यात असलेल्या पालिकांना पैसे मिळालेले नाहीत. ही बाब आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठांच्या कानावर घातली आहे. मुख्यमंत्र्यांच्या देखील ही बाब आम्ही लक्षात आणून दिली असून त्यांनी आम्हाला निधी देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे पालिकेला नक्कीच निधी मिळेल, अशी अपेक्षा काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी व्यक्त केली होती. जालन्यातील काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या 4 पालिकांचा रद्द करण्यात आलेला निधी पुन्हा मिळावा अशी मागणी देखील गोरंटयाल यांनी केली होती. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून किती खर्च झाला? धक्कादायक माहिती आली समोर तर दुसरीकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मात्र, 'काँग्रेस आमदार नाराज नाही, मतदारसंघातील कामांबद्दल काही अपेक्षा आहे,' असं म्हटलं आहे. 'तिन्ही पक्षांचे मिळून 171 आमदार आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्वांनी आपआपल्या मतदारसंघात राहुन काम करणे गरजे आहे आणि आमदारांना काय लागते काय नाही, हे जाणून घेणे आणि त्यांना मदत करणे याची जबाबदारी आमच्या सरकारवर  आहे.  काही आमदारांमध्ये  नाराजी आहे ती आम्ही बोलून घालवू' असंही थोरात यांनी सांगितले.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Ajit pawar, अजित पवार

पुढील बातम्या