Home /News /mumbai /

महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के, आधी शिवसेनेचे आता काँग्रेसचे काही आमदार नॉट रिचेबल

महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के, आधी शिवसेनेचे आता काँग्रेसचे काही आमदार नॉट रिचेबल

शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसमधीलही (Congress) काही आमदार नॉट रिचेबल असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

    मुंबई, 21 जून : राज्याच्या महाविकास आघाडी सरकारवर मोठं संकट ओढावलं आहे. शिवसेनेचे प्रमुख नेत्यापैकी एक असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारलं आहे. शिंदे यांची मनधरणी करण्यात शिवसेनेला यश आलं नाही तर या बंडाच्या ठिणगीचा वणवा होण्यास वेळ लागणार नाही. या महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावर मोठा घाव पडू शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीतील तीनही पक्ष सतर्क झाले आहेत. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. या सर्व घडामोडी एकीकडे घडत असताना आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसमधीलही काही आमदार नॉट रिचेबल असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे मुंबईत राजकीय नाट्याच्या प्रचंड घडामोडी सुरु आहेत. या घटना आणखी कुठपर्यंत नेतील याचा आताच अंदाज बांधणं कठीण होऊ शकतं. पण हे सरकार मोठ्या संकटात सापडल्याचं सध्याचं दृश्य आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काल नुकत्याच विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पुरेशी मतं असूनही महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार हे या निवडणुकीत अगदी काठावर पास झाले. या निवडणुकीमुळे काँग्रेसमध्येही मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे अनेक आमदार नाराज आहेत. तसेच काँग्रेसच्या काही आमदाराचे मते या निवडणुकीत फुटल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. विशेष म्हणजे महाविकास आघाडीची तब्बल 21 मतं फुटल्याची चर्चा होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत असंतोष निर्माण झाल्याची बातमी समोर आली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणाची मतं फुटली या विषयावर चर्चा करण्यासाठी आज मुंबईत बैठक बोलावण्यात आली होती. या दरम्यान काँग्रेसचे पाच आमदार हे नॉट रिचेबल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विजय वडेट्टीवार 10 आमदारांसह सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत? दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली 10 आमदारांसह बाहेर पडण्याचा तयारीत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. विधानपरिषदेत झालेल्या पराभवानंतर विजय वडेट्टीवार आपल्या 10 आमदारांसोबत बाहेर पडणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. काँगेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेनेपाठेपाठ काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दुफळी दिसून येत आहे. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडेल का यावर शंका व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेचे हे आमदार आहेत नॉट रिचेबल आमदार एकनाथ शिंदे – कोपरी, अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद, शंभूराज देसाई – पाटण, सातारा, संदीपान भुमरे – पैठण, औरंगाबाद, उदयसिंह राजपूत – कन्नड, औरंगाबाद, भरत गोगावले – महाड, रायगड, नितीन देशमुख – बाळापूर, अकोला, अनिल बाबर – खानापूर,आटपाडी सांगली, विश्वनाथ भोईर – कल्याण(प), संजय गायकवाड - बुलढाणा, संजय रामुलकर - मेहकर, महेश शिंदे – कोरेगाव, सातारा, शहाजी पाटील – सांगोला, सोलापूर, प्रकाश आबिटकर – राधानगरी, कोल्हापूर, संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ, ज्ञानराज चौघुले – उमरगा, उस्मानाबाद, तानाजी सावंत – पारंडा, उस्मानाबाद, संजय शिरसाट – औरंगाबाद(प), रमेश बोरनारे – वैजापूर, औरंगाबाद, सुहास कांदे, नांदगाव, नाशिक, बालाजी कल्याणकर , नांदेड उत्तर, शांताराम मोरे, भिवंडी ग्रामीण, महेंद्र दळवी, अलिबाग, महेंद्र थोरवे, कर्जत हे आमदारा नाराज असल्याचे सांगण्यात आले आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Eknath Shinde, Maharashtra politics, Mla, Shiv sena

    पुढील बातम्या