मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /पक्षाविरोधात 'बच्चन'गिरी भोवली, काँग्रेसने नागपूरच्या नेत्याला दाखवला बाहेरचा रस्ता!

पक्षाविरोधात 'बच्चन'गिरी भोवली, काँग्रेसने नागपूरच्या नेत्याला दाखवला बाहेरचा रस्ता!

(आशिष देशमुख यांची हकालपट्टी)

(आशिष देशमुख यांची हकालपट्टी)

आज त्यांनी थेट महाविकास आघाडीवरच टीका केली होती. अखेरीस काँग्रेसने पत्रक काढून आशिष देशमुख यांची हक्कालपट्टी केली आहे

मुंबई, 24 मे : आपल्याच पक्षाविरोधात विधानं करणे, सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन गोंधळ उडवून देणारे काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष विरोधी कारवाई केल्याने पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विदर्भातील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख या ना त्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी थेट महाविकास आघाडीवरच टीका केली होती. अखेरीस काँग्रेसने पत्रक काढून आशिष देशमुख यांची हक्कालपट्टी केली आहे. 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आङे. पक्ष विरोधी कारवाई केल्याने शिस्तपालन समितीकडून कारवाई करण्यात आली आहे. 22 मे रोजी पत्राद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, आजही आशिष देशमुख यांनी खळबळजनक असं विधान केलं आहे. उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे एकत्र येतील आणि महाविकास आघाडी तुटेल, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

('शिंदे-फडणवीस' सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला, प्रोटोकॉल विभागाला अलर्ट!)

आशिष देशमुख म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट एकत्र येऊन महाविकास आघाडी तुटेल. दोन्ही गट एकत्र आल्यानंतर भाजपला पाठिंबा देणार असल्याचा दावाही आशिष देशमुख यांनी केला. सध्याच्या परिस्थितीत ठाकरे गटाचे खासदार, आमदार निलंबित होऊ नये म्हणून ठाकरे गट शिंदे गटासोबत जाईल. ठाकरे गटाच्या कोणत्याही आमदार, खासदारांना आपलं राजकीय भवितव्य डावावर लावायचं नाही, असंही आशिष देशमुख म्हणाले.

(अखेर आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा, मुख्यमंत्री शिंदेंचे मानले आभार)

काही दिवसांपूर्वी आशिष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्या भेटीला काही दिवस होताच आशिष देशमुख यांनी केलेल्या या वक्तव्यांमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आता अखेरीस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

आशिष देशमुख यांनी काय केली होती टीका?

राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. मोदी आडनावावरुन राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे, असं भाष्य केलं होतं.

'नाना पटोलेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला एक खोका मिळत असल्याचा दावा, आशिष देशमुख यांनी केला होता. पटोले हे लवकरच गुवाहाटीला असतील, त्यांना सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला 1 खोका दिला जातो, असा खळबळजनक आरोपही आशिष देशमुख यांनी केला होता.

First published:
top videos

    Tags: Congress