‘हे तर काँग्रेसचं षडयंत्र,’ कोर्टाच्या निर्णयानंतर साध्वी प्रज्ञासिंहचा आरोप

‘हे तर काँग्रेसचं षडयंत्र,’ कोर्टाच्या निर्णयानंतर साध्वी प्रज्ञासिंहचा आरोप

2008 च्या मालेगाव बाँबस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित याच्यासह अन्य 5 जणांवर आरोप निश्चित केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 30 ऑक्टोबर : ‘हे काँग्रेसचे माझ्याविरूद्धचे षडयंत्र असून माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे आहेत,’ असं साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने 2008 च्या मालेगाव बाँबस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित याच्यासह अन्य 5 जणांवर आरोप निश्चित केले आहेत.

कोर्टाच्या या निर्णयावर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी प्रतिक्रिया आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी कधीच अभिनव भारत संघटनेची सदस्य नव्हते. माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे असून हे माझ्याविरूद्धचं षडयंत्र आहे,’ असं साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या.

दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह यांनी काँग्रेसवर थेट आरोप केल्याने आता या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे.

कोर्टाने काय निर्णय दिला?

मालेगाव बाँबस्फोटप्रकरणी अखेर 7 जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. यामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह इतर 5 जणांचा समावेश आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटलं की, ‘या सर्व जणांवर अभिनव भारत संघटनेद्वारे दहशत पसरवण्यासाठी कट करणे आणि 29 सप्टेंबरला झालेल्या घटनेत समावेश असल्याचा आरोप आहे. हे कृत्य दहशतवादामध्ये येतं.’

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने या आरोपींना जामीन मंजूर करत दिलासा दिला होता. आता कोर्टाने 7 जणांवर आरोप निश्चित केल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. आता या प्रकरणात आरोपींच्या शिक्षेसाठी 2 नोव्हेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे.

VIDEO : वानराने गारुड्याचा साप पळवला आणि खाऊन टाकला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2018 05:08 PM IST

ताज्या बातम्या