काँग्रेसने पाळला आघाडीचा धर्म अन् शिवसेनेनं निवडणूक जिंकली, भाजपचा पराभव

काँग्रेसने पाळला आघाडीचा धर्म अन् शिवसेनेनं निवडणूक जिंकली, भाजपचा पराभव

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यानंतर आता स्थानिक निवडणुकीतही तिन्ही पक्ष एकत्र येत भाजपला दूर सारत आहे.

  • Share this:

मुंबई, 05 ऑक्टोबर :  शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यानंतर आता स्थानिक निवडणुकीतही तिन्ही पक्ष एकत्र येत भाजपला दूर सारत आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी सभापती आणि शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्व पक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

लॉकडाउन लागू झालेल्यामुळे लांबलेल्या स्थानिक निवडणुका आता पार पडत आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी सभापती आणि शिक्षण समितीची आज निवडणूक पार पडत आहे. शिक्षण समितीची निवडणुकीत ऐन वेळी नाट्यमय घडामोडींना वेग आला.  शिवसेनेच्या संध्या दोशी यांचा अध्यक्षपदी निवड झाली आहे.   शिक्षण समिती निवडणुकीत भाजपच्या सुरेखा पाटील यांचा संध्या दोशी यांनी पराभव केला आहे.

या निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपला उमेदवार दिला होता. पण, आज ऐनवेळी काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळत उमेदवारी अर्ज मागे घेतला.  तसंच मतदानाच्या वेळी काँग्रेसने तटस्थ भूमिका घेतली. तर, राष्ट्रवादी आणि सपाच्या नगरसेवकांनी शिवसेना उमेदवार संध्या दोशी यांना पाठिंबा दिला. त्यामुळे शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेनं बाजी मारली.

आज दुपारी दोन वाजता स्थायी सभापतीची निवड होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या  निवडणुकीसाठी यशवंत जाधव यांना शिवसेनेनं तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे.

पण, महापालिकेतील विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने स्थायी पदासाठी सुद्धा अर्ज भरला होता. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. मात्र, आता राज्यातील आघाडी धर्म टिकवण्यासाठी काँग्रेस माघार घेत असल्याची माहिती मिळत आहेत. शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडीत काँग्रेसने अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे स्थायी सभापती निवडीत सुद्धा काँग्रेस आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेनेनं नरमाईची भूमिका घेतली होती. शिवसेनेनं उमेदवार देऊन ऐनवेळी माघार घेतली होती. सेनेनं राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीकडे स्थायी समितीचे अध्यक्षपद गेले होते. आता मुंबई पालिकेतही काँग्रेसने माघार घेऊन सेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Published by: sachin Salve
First published: October 5, 2020, 1:11 PM IST

ताज्या बातम्या