मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईची तुलना PoK सोबत करणाऱ्या अभिनेत्रीचं समर्थन करणाऱ्या भाजपसोबत जाणार का? काँग्रेसचा राज ठाकरेंना सवाल

मुंबईची तुलना PoK सोबत करणाऱ्या अभिनेत्रीचं समर्थन करणाऱ्या भाजपसोबत जाणार का? काँग्रेसचा राज ठाकरेंना सवाल

Congress on BJP-MNS alliance news: भारतीय जनता पक्ष आणि मनसे यांची युती होण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावर आता काँग्रेसने राज ठाकरेंना सवाल विचारला आहे.

Congress on BJP-MNS alliance news: भारतीय जनता पक्ष आणि मनसे यांची युती होण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावर आता काँग्रेसने राज ठाकरेंना सवाल विचारला आहे.

Congress on BJP-MNS alliance news: भारतीय जनता पक्ष आणि मनसे यांची युती होण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावर आता काँग्रेसने राज ठाकरेंना सवाल विचारला आहे.

मुंबई, 29 जुलै: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची नाशकात भेट सुद्धा झाली. यानंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चेला आणखी जोर आला. यावरुन आता काँग्रेसने (Congress) राज ठाकरेंना थेट सवाल केला आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Mumbai Congress President Bhai Jagtap) यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत करणाऱ्या अभिनेत्रीचं भाजप समर्थन करतं आणि अशा पक्षासोबत तुम्ही जाणार का? असा सवाल भाई जगताप यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना करत म्हटलं, ते पक्षाचे प्रमुख आहेत ते याबाबत ठरवू शकतात.

एक कृपा शंकर गेले म्हणजे सर्व उत्तर भारतीय गेले असे होत नाही. मुंबई काँग्रेसमध्ये अनेक नेते हे उत्तर भारतीय आहेत. मुंबईत 18 ते 19 टक्के उत्तर भारतीय आहेत असंही भाई जगताप यांनी म्हटलं आहे.

भाजपसोबतच्या युतीवर राज ठाकरे म्हणाले...

राज ठाकरेंनी परप्रांतियांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली तर आम्ही युतीबाबत विचार करु असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावर राज ठाकरेंनी म्हटलं, "भूमिका स्पष्ट काय करायच्या, माझ्या भूमिका स्पष्ट आहेत. मी आतापर्यंत ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या अगदी स्पष्ट आहेत. महाराष्ट्र हिताच्या भूमिका आहेत. त्यासोबतच देशहिताच्या सुद्धा भूमिका मांडल्या आहेत. प्रत्येक राज्याने आपआपली भूमिका कशी निभावली पाहिजे आणि काय काय केले पाहिजे. तुम्ही आमच्यावर आक्रमक केले नाही पाहिजे आणि आम्ही तुमच्यावर आक्रमण करत नाहीयेत".

"भूमिकांना विरोध आहे, व्यक्तींना विरोध नाही. माझा नरेंद्र मोदींना विरोध नाही आणि अमित शहांनाही नाहीये, वैयक्तिक देणघेणं नाहीये. ज्या भूमिका नाही पटल्या त्याचा विरोध केला आणि ज्या भूमिका पटल्या त्यांबाबत अभिनंदनही केलं आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तुम्ही प्रश्न निर्माण करायचे आणि आम्हाला उत्तरं द्यायला सांगायचे. युतीच्या बातम्या तुम्ही रंगवता, मी जो काही आहे तो आहे, माझी भूमिका बदलत नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Congress, MNS, Raj Thackeray