विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, मुंबईत या उमेदवारांना मिळालं तिकीट!

विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, मुंबईत या उमेदवारांना मिळालं तिकीट!

काँग्रेसने आपल्या पहिल्या 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दिग्गज नेत्यांसह अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकांच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या पहिल्या 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दिग्गज नेत्यांसह अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधी काँग्रेसमधून जोरदार आऊटगोईंग झालं. त्याचा फटका काँग्रेसला बसल्यामुळे नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

यात मुंबईतील काही जागांवरही काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मिरा-भाईंदर, भांडूप, अंधेरी, चांदिवली, चेंबूर, वांद्रे, धारावी आणि सायन-कोळीवाडा या जागांवर काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे.

ही आहेत काँग्रेसच्या मुंबईतील उमेदवारांची नावं

मिरा भाईंदर- सय्यद मुझफ्फर हुसेन

भांडूप (पश्चिम)- सुरेश हरिशचंद्र कोपरकर

अंधेरी (पश्चिम)- अशोक भाऊ जाधव

चांदिवली- मोहम्मद आरिफ नसीम खान

चेंबुर- चंद्रकात दामोदर हंदोरे

वांद्रे (पूर्व)- जिशान जियाउद्दीन सिध्दीकी

धारावी- वर्षा एकनाथ गायकवाड

सायन कोळीवाडा- गणेश कुमार यादव

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. कॉंग्रेसचे सचिव मुकुल वासनिक यांनी ही यादी जाहीर केली आहे. नव्या चेहऱ्यांना कमी संधी देण्यात आली असून या यादीवर जुन्या चेहऱ्यांचे प्राबल्य दिसत आहे. लातूरमधून अमित विलासराव देशमुख, सोलापूर मध्यमधून प्रणिती सुशिलकुमार शिंदे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

अशी आहेत उमेदवार

अक्कलकुवा - के.सी पडवी

शहादा - पदमाकर विजयसिंग वालवी

नवापूर - शिरिष नाईक

रावेर - शिरिष चौधरी

बुलडाणा - हर्षवर्धन सकपाळ

मेहकर- अनंत वानखेडे

रिसोड - अमित जनक

धामनगाव - विरेंद्र जगताप

तिवसा - यशोमती ठाकूर

आर्वी - अमर शरद काळे

देवळी- रंजीत प्रताप कांबळे

सावनेर- सुनील छत्रपाल केदार

नागपूर उत्तर- एससी- डॉ. नितीन राऊत

ब्रह्मपुरी- विजय नामदेवराव वजेट्टीवार

चिमुर- सतीश मनोहर वर्जुराकर

वरोरा- प्रतिभा सुरेश धानोरकर

यवतमाळ- अनिल बाळासाहेब मांग्रुळकर

भोकर- अशोकराव शंकरराव चव्हाण

नांदेड उत्तर- डी.पी. सावंत

नायगाव- वसंतराव बळवंतराव चव्हाण

देगलूर- रावसाहेब जयवंत अनंतपुरकर

काळणूरी- संतोष कौतिका तर्फे

पाथरी- सुरेश अंबादास वारपुडकर

फुलंब्री- डॉ. कल्याण वैजंथराव काळे

मालेगाव (मध्य)- शैख असिफ शैख राशिद

अंबरनाथ- रोहित चंद्रकात साळवे

मिरा भाईंदर- सय्यद मुझफ्फर हुसेन

भांडूप (पश्चिम)- सुरेश हरिशचंद्र कोपरकर

अंधेरी (पश्चिम)- अशोकभाऊ जाधव

चांदिवली- मोहम्मद आरिफ नसीम खान

चेंबूर- चंद्रकात दामोदर हंदोरे

वांद्रे (पूर्व)- जिशान जियाउद्दीन सिध्दीकी

धारावी- वर्षा एकनाथ गायकवाड

सायन कोळीवाडा- गणेश कुमार यादव

मुंबादेवी- अमिन अमीराली पटेल

कोलाबा- अशोक अर्जुनराव जगताप

महाड-माणिक मोतिराम जगताप

पुरंदर- संजय चंद्रकांत जगताप

भोर- संग्राम अनंतराव तोपते

पुणे (sc) -रमेश अनंतराव बागवे

संगमनेर- विजय बाळासाहेब थोरात

लातुर शहर- अमित विलासराव देशमुख

निलंगा- अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर

औसा- बासवराज माधवराव पाटील

तुळजापूर- मधुकरराव देवराम चव्हाण

सोलापूर शहर मध्य- प्रणिती सुशील कुमार शिंदे

सोलापूर दक्षिण- मौलबी बाशुमिया सयीद

कोल्हापूर दक्षिण- ऋतुराज संजय पाटील

कारवीर- पी.एन. पाटील सादोळीकर

पळुस- कडेगाव- डॉ. विश्वजीत पतंगराव कदम

288 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

- अधिसूचना - 27 सप्टेंबर.

- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 4 ऑक्टोबर.

- उमेदवारी अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर.

- उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख - 7 ऑक्टोबर

- उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षक पाठवणार

- 2 नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार

Published by: Renuka Dhaybar
First published: September 29, 2019, 7:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading