अखेर मुंबई काँग्रेसला मिळाला नवा कार्याध्यक्ष, काँग्रेसनं खेळला खास डाव

अखेर मुंबई काँग्रेसला मिळाला नवा कार्याध्यक्ष, काँग्रेसनं खेळला खास डाव

राहुल गांधी यांनी मिलिंद देवरा यांचा राजीनामा फेटाळत नवा कार्याध्यक्ष नियुक्त केलाय.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई 26 जुलै : मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतर गेले काही दिवस अधांतरी असलेल्या मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर अखेर तोडगा निघालाय. मिलिंद देवरांचा राजीनामा मंजूर न करता ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी आज नियुक्ती करण्यात आलीय. गायकवाड हे मुंबई काँग्रेसचा दलित चेहेरा म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दलित आणि मराठी माणसाची नियुक्ती करून काँग्रेसने नवा डाव खेळलाय. राहुल गांधी यांनी मिलिंद देवरा यांचा राजीनामा फेटाळला आहे.

नरेंद्र मोदींच्या सर्वात मोठ्या विरोधकाची भेट घेणार राज ठाकरे, हे आहे खास कारण

लोकसभेतल्या पराभवाची जबाबदारी घेत मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला होता. मात्र तो राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता. त्यावरून संजय निरुपम यांनी देवरांवर टीकाही केली होती. देवरांना राष्ट्रीय पातळीवर पद पदरात पाडून घ्यायचं आहे अशी जाहीर टीका त्यांनी केली होती. त्यामुळे मुंबई काँग्रेसमधले मतभेद चव्हाट्यावर आले होते. एक अध्यक्ष देण्यापेक्षा तीन कार्याध्यक्ष नियुक्त करावेत अशी सूचना देवरांनी केली होती.

मुंबईकरांनो सावधान.. पुढील तीन दिवस पावसाचे, हवामान विभागाने दिला Orange Alert

निरुपम आणि देवरा यांच्यात अनेक वर्षांपासून वाद आहे. निरुपम हे एकाधिकारशाही करतात असा आरोप करत मुंबईतल्या अनेक नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर वाद शमविण्यासाठी मिलिंद देवरा यांची मुंबईच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही वाद शमले नाहीत.

मुंबई काँग्रेसमधले गट तट आणि मतभेद मिटवत विधानसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्याचं काम एकनाथ गायकवाड यांना आता करावं लागणार आहे.

First published: July 26, 2019, 7:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading