S M L

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांची सुटका

तसंच आरोपपत्रानुसार कृपाशंकर यांच्याविरोधात कोणतेही सबळ पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरलीय.

Sachin Salve | Updated On: Feb 14, 2018 11:32 PM IST

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांची सुटका

14 फेब्रुवारी : काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांना मोठा दिलासा मिळालाय. कृपाशंकर सिंह यांना एसीबीच्या केसमधून मुक्त करण्यात आलंय.

कोणत्याही लोकनेत्या विरोधात खटला चालवण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. मात्र या प्रकरणात ती घेण्यात आली नसल्यानं कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात खटला चालवताच येणार नसल्याचं त्यांच्या वतीनं एसीबी कोर्टात सांगण्यात आलंय.

तसंच आरोपपत्रानुसार कृपाशंकर यांच्याविरोधात कोणतेही सबळ पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरलीय. त्यामुळे कृपाशंकरसिंह यांना त्यांच्याविरोधात लाचलुचपत विभागामार्फत दाखल झालेल्या खटल्यातून दिलासा मिळालाय.

आपल्या मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या आरोपात एसीबीनं कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 11:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close