Home /News /mumbai /

IMD Alert: राज्यात धुमाकूळ घालणारा पाऊस आता परतीच्या वाटेवर

IMD Alert: राज्यात धुमाकूळ घालणारा पाऊस आता परतीच्या वाटेवर

An Indian woman collects tree branches fallen on a road after a heavy downpour during lockdown in Gauhati, India, Wednesday, April 15, 2020. Indian Prime Minister Narendra Modi on Tuesday extended the world's largest coronavirus lockdown to head off the epidemic's peak, with officials racing to make up for lost time. (AP Photo/Anupam Nath)

पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागातून पाऊस परतण्यास सुरूवात होईल असं IMDने म्हटलं आहे. यावर्षी पाऊस परतण्याचा कालावधी थोडा लाबंला आहे.

मुंबई 20 ऑक्टोबर:  गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने तुफान धुमाकूळ घातला होता. यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. धुमाकूळ घालणारा हा पाऊस आता परतीच्या वाटेवर असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागातून पाऊस परतण्यास सुरूवात होईल असं IMDने म्हटलं आहे. या वर्षी पावसाच्या परतीचा प्रवास हा थोडा लांबणीवर पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे सोलापूर, लातूर, कोल्हापूर, सांगली या भागाला मोठा तडाखा बसला होता, लाखो हेक्टरवरचं उभं पिक वाहून गेलं आहे. अनेक शेतांमधली तर जमीन खरडून निघाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट निर्माण झालं होतं. तर पावसाळा सुरू असताना मुंबई, पुणे या मोठ्या शहरांनाही जोरदार तडाखा बसला होता. कमी दाबाचा पट्ट निर्माण झाल्याने राज्यात प्रचंड पाऊस कोसळला आहे. कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने नदी काठची अनेक गावे जलमय झाली होती. काही महिन्यांमध्ये पडणारा पाऊस हा काही तासांमध्ये पडल्याने सगळ्याच व्यवस्था कोलमडून पडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोसळणाऱ्या पावसालाच परतीला पाऊस म्हटल्या जात होत. मात्र हा परतीचा पाऊस नाही असं हवामान खात्याने म्हटलं होतं. आता मात्र पावसाच्या परतण्याला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पण हा परतणारा पाऊसही अनेकदा तडाखा देऊन जात असतो अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: IMD, IMD FORECAST, Rain

पुढील बातम्या