समीर आणि पंकज भुजबळांवर आणखी एक गुन्हा दाखल

समीर आणि पंकज भुजबळांवर आणखी एक गुन्हा दाखल

. खोटी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन त्याआधारे भूखंड लाटल्या प्रकरणी मुंबई एसीबीने फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केलाय.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई

13 जुलै : भुजबळ परीवारातील सदस्यांवर आणखी एका गुन्ह्याची नोंद झालीये. समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. खोटी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन त्याआधारे भूखंड लाटल्या प्रकरणी मुंबई एसीबीने फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केलाय.

पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ हे संचालक असलेल्या भावेश प्रा.लि कंपनीनं ओशिवरा तुळशी को आॅप हौसिंग सोसायटी लि. ही संस्था तयार करुन त्या संस्थेच्या नावे भूखंड लाटण्यात आला असून, तुळशी गृहनिर्माण सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक प्रशांत सावंत, सेक्रेटरी मुन्ना सय्यद, सभासद अजित वळुंज, तुकाराम पारकर, संजय पराडकर, तत्कालीन म्हाडा प्राधिकरणाचे सदस्य ताजुद्दीन मुजाहीद, यांनी साक्षिदारांची कागदपत्रे गैरमार्गाने मिळवली.

वेळेवेळी खोटे साक्षिदार बनून सह्या केल्या आणि खोटे दस्तावेज बनवले. त्याआधारे ओशीवरा तुळसी का आॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटी ही खोटी गृहनिर्माण संस्था बनवून शासनाची फसवणूक करुन भुखंड लाटल्या प्रकरणी एसीबीनं गुन्हा दाखल केला आहे. तर तत्कालीन भूमापक शिरीष शृंगारपुरे, सुर्यकांत देशमुख, तत्कालीन मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकस मंडळाचे मुख्य अधिकारी, सुरेश कारंडे, यांनी पात्र सभासदांची कोणतेही कागदपत्र न तपासता लाभ मिळवून बोगस सभासदांना पात्र ठरवले असं एसीबीच्या तपासात आढळून आलं आहे.

तर, अनिल वेलिंग, श्यामसुंदर शिंदे, संजय सिंह, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकारणाचे तत्कालीन अध्यक्ष उत्तम खोब्रागडे, मुख्य अधिकारी सुभाष सोनावणे, म्हाडा प्राधिकरणातील नियोजन विभागाचे मुख्य वास्तुशास्त्रज्ञ दीपक मंडलेकर यांनी त्यांना कोणताही अधिकार नसताना त्या गृहनिर्माण भुखंडांचे आरक्षण अनिवासी केला असं एसीबीनं गुन्हा नोंदवताना म्हटलं आहे.

त्यानंतर तो भुखंड पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ हा संचालक असलेल्या भावेश बिल्डर्स प्रा.लि.कंपनीनं व्यावसायिक बांधकामाकरता पैसे पुरवून लाभ मिळवला आणि शासनाची फसवणुक केली म्हणून या सर्व १७ जणांवर एसीबीने कलम ४२०, ४०९, ४६५, ४६६, ४६८, ४७१ सह ३४, १०९, १२० (ब) भा.द.वि. सह कलम १३(१) (क), १३(१)(ड) सह १३(२) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे आता पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झालीये.

एवढंच नाही तर एसीबीने या गृह निर्माण संस्था आणि १७ जणांच्या विविध कार्यालये आणि घरांवर देखील छापे टाकून ठोस पुरावे जप्त केले आहेत.

First published: July 13, 2017, 7:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading