मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

नाशिक पोलिसांत तक्रार, सेनेचे मंत्री अनिल परब यांनी केला खुलासा

नाशिक पोलिसांत तक्रार, सेनेचे मंत्री अनिल परब यांनी केला खुलासा

'CBI चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 29 मे : महाविकास आघाडी सरकारच्या (MVA Goverment) मंत्र्यांविरोधात आरोपाचे सत्र सुरूच आहे.  शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. नाशिकमध्ये (Nashik) निलंबित अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. परंतु, माझ्या आणि इतर 5 अधिकाऱ्यांविरोधातील ही तक्रार  पूर्णतः निराधार व खोटी आहे, असा दावा अनिल परब यांनी केला आहे.

नाशिकमधील पंचवटी पोलिसात (Panchvati Police) अनिल परब यांच्याविरोधात गजेंद्र पाटील यांनी तक्रार केली आहे. पदोन्नतीमध्ये गैरव्यहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या  प्रकरणाचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे क्राईम ब्रांचला दिले आहे. तक्रारदार गजेंद्र पाटील यांना चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एकापाठोपाठ ट्वीट करत आपल्यावर झालेल्या आरोप खोडून काढले आहे. 'निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसंच परिवहन आयुक्त व इतर 5  अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे, विभागातील अनेक तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे, अशी टीका परब यांनी केली.

ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात, फडणवीस म्हणाले, आता तरी नाकर्तेपणा सोडा!

'मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून उच्च न्यायालयामार्फत CBI चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे, असंही परब म्हणाले.

इतका श्रीमंत आहे हा गँगस्टर! जिकडे बघावं तिकडे पैसेच, मुंबई पोलिसही चक्रावले

'या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करीत असून, चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल', असंही परब म्हणाले.

First published: