राज्य निवडणूक आयोगावर मुख्यमंत्र्यांचा दबाव,काँग्रेसची तक्रार

राज्य निवडणूक आयोगावर मुख्यमंत्र्यांचा दबाव,काँग्रेसची तक्रार

  • Share this:

मुंबई, 05 जून : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत प्रचारावरुन काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि भाजप वारंवार निवडणूक आचरसंहितेचा भंग करत असल्याचं वारंवार निदर्शनास आलंय. त्यामुळे महाराष्ट्रात निवडणूक आयोग मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असल्याने तेथील निवडणुका निःपक्षपातीपणे नाही अशी तक्रार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने देशाच्या मुख्य निवडणूक आयोगाकडे केलीये.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह काँग्रेस पदाधिका-यांचे शिष्टमंडळाने  दिल्ली येथे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांची भेट घेऊन ही तक्रार दाखल केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2018 04:58 PM IST

ताज्या बातम्या