'चौकीदार चोर है' घोषणेमुळे राहुल गांधींच्या विरोधात तक्रार

'चौकीदार चोर है' घोषणेमुळे राहुल गांधींच्या विरोधात तक्रार

'चौकीदार चोर है' या घोषणेमुळे राहुल गांधी अडचणी येण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 12 मार्च: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून भाजप विरुद्ध काँग्रेस या लढतीत अन्य प्रादेशिक पक्ष देखील आक्रमकपणे मोदी सरकारविरुद्ध मैदानात उतरले आहेत. 2014च्या लोकसभेत सौम्य वाटणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यंदा मात्र थेट भाजप आणि मोदींवर टीका करत आहेत. राफेल करारावरुन राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून PMमोदींवर सातत्याने टीका करत आहेत. अनके रॅली आणि सभांमध्ये त्यांनी 'चौकीदार चोर है' ही घोषणी दिली होती. पण आता या घोषणेमुळे राहुल गांधी अडचणी येण्याची शक्यता आहे.

मुंबईतील बीकेसी पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी चौकीदाराला चोर म्हटल्याने सुरक्षा रक्षकांच्या भावना दुखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महाराष्ट्र सुरक्षारक्षक युनियनच्यावतीने बीकेसी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राफेल करारात पंतप्रधान मोदी यांनी अनिल अंबानी यांचा फायदा करुन दिला असे सांगत राहुल गांधी यांनी चौकीदार चौर है, असे म्हटले होते. यासाठी त्यांनी अनेक पुरावे देखील दिले होते. अनेक रॉलीत आणि सभांमध्ये देखील राहुल गांधी ही घोषणा देत असतात.

VIDEO : मसूद अजहरला आमच्या काळात अटक, गुजरातमधील राहुल गांधींंचं UNCUT भाषण

First published: March 12, 2019, 6:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading