कोण होणार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू?

कोण होणार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू?

मुंबई विद्यापीठ कुलगुरू पदासाठी शॉर्टलिस्ट झालेल्या पाचपैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल : मुंबई विद्यापीठ कुलगुरू पदासाठी शॉर्टलिस्ट झालेल्या पाचपैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. सरकार ज्याचे असते तो आपल्या मर्जीतली व्यक्ती कुलगुरू पदावर बसवतो, असा यापूर्वीचा इतिहास सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक असल्याने डॉ. राजन वेळूकर यांची मुक्त विद्यापीठावरून थेट मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर वर्णी लागली होती.

सध्याच्या सरकारमध्ये संघाशी जवळीक असलेले डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरू पदाची खुर्ची लाभली होती. आता नवा कुलगुरूही तशीच पार्श्वभूमी असलेला नेमला जाईल, असा कयास लावला जात आहे.

संभाव्य नावं

डॉ.सुहास पेडणेकर - रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य

डॉ. प्रमोद येवले - नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू

विभा सुराणा - मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या प्रमुख

डॉ. अनिल कर्णिक -  मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख

डॉ. विलास सपकाळ - अमरावती विद्यापीठातील प्राचार्य

राज्यपाल राव यांनी या पाचही उमेदवारांच्या गुरुवारी मुलाखती घेतल्या. प्रत्येकाला फक्त सहा मिनिटेच दिली गेली. त्यानंतर कुलगुरूंच्या नावाची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु गुरुवारी आणि आजही काहीच जाहीर करण्यात आले नाही.

यापैकी येवले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले समजले जातात. पेडणेकर हे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आवडीचे आहेत. त्यामुळे खरी चुरस या दोघांमध्ये आहे.

First published: April 21, 2018, 11:24 AM IST

ताज्या बातम्या