• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • सामान्य मुंबईकर होऊ शकता 'पोलीस', मुंबई पोलिसांचा नवा उपक्रम

सामान्य मुंबईकर होऊ शकता 'पोलीस', मुंबई पोलिसांचा नवा उपक्रम

मुंबई पोलिस सध्या अशा जबाबदार मुंबईकरांच्या शोधात आहेत जे या करोनाच्या काळात मुंबईकरांचा ताण कमी करु शकतील. त्यांना काही दिवसांसाठी पोलिस बनवलं जाणार आहे.

  • Share this:
मुंबई, 27 एप्रिल : तुम्हाला पोलीस बनायचं होतं पण काही कारणास्तव तुम्ही भरती होवू शकला नाही. मात्र तरीही तुम्हाला पोलीस बनून समाजासाठी काही तरी करायची इच्छा असेल तर मुंबई पोलीस (Mumbai Police) तुमची ही इच्छा पूर्ण करेल. मुंबई पोलीस सध्या अशा जबाबदार मुंबईकरांच्या शोधात आहेत जे या करोनाच्या (Corona) काळात मुंबईकरांचा ताण कमी करु शकतील. त्यांना काही दिवसांसाठी पोलिस बनवलं जाणार आहे. (वाचा-कडक सॅल्युट..! आत्महत्या करायला निघालेल्या तरुणीचे मुंबई पोलिसांनी वाचवले प्राण) मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाचं नाव ''जबाबदार मुंबईकर, जबाबदार मुंबई पोलीस'' अस आहे. या अंतर्गत जबाबदार मुंबईकर नागरिकांना मुंबई पोलीस दलात प्रवेश दिला जाईल. सध्या करोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात पोलिसांवरचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. 24 तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर आलेला हा ताण कमी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ही एक युक्ती शोधून काढलीय. मुंबई पोलिसांनी कायद्याचा आधार घेत हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 च्या कलम 21 (9) नुसार पोलिस आयुक्तांना विशेष अधिकार आहे. त्यानुसार कलम 10 अन्वये पोलीस आयुक्त कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधक उपाययोजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष पोलिस अधिकारी म्हणून सामान्य नागरीकांची नेमणूक करू शकतात. (वाचा-जागतिक आरोग्य संघटनाही देशाच्या मदतीला सरसावली, सद्यस्थितीबाबत व्यक्त केली चिंता) विशेष म्हणजे सामान्य नागरिकांना यासाठी कोणतीही परीक्षा किंवा मैदानी चाचणी द्यावी लागणार नाही. पण तसं असलं तरी ही नियुक्ती करताना पोलिस विशेष काळजी घेतात. तसंच नियुक्ती झालेल्या व्यक्तीलाही काळजी घ्यावी लागते. असे असेल स्वरुप पोलीस उपायुक्त विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करतील स्थानिक पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक निवड करतील पोलीस मित्र किंवा स्वयंसेवक म्हणुन पोलिसांसोबत काम केलेले असल्यास प्राधान्य सोसायटीचे चेअरमन, सेक्रटरी, सदस्य, सुरक्षा प्रमुख यांनाही प्राधान्य निवड होणाऱ्यावर कोणताही गुन्हा दाखल नसावा राजकीय आणि धार्मिक पार्श्वभूमीची नसावी निवड झाल्यानंतर घ्यावी लागणारी काळजी - नियुक्तीनंतर संबंधित व्यक्ती कोणाशीही असभ्य भाषेत बोलू शकणार नाही - नियुक्ती झालेल्या व्यक्तीने कोणालाही शारिरीक - मानसिक त्रास देणे योग्य नाही - नियुक्ती झालेली व्यक्ती कोणावरही बळाचा वापर करु शकत नाही - नियुक्ती झालेल्या व्यक्तीला कोणतेही आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार नसतील - नियुक्त झालेल्या व्यक्तीचे पद कधीही रद्द करता येवू शकते - नियंमांचे उल्लंघन केल्यास विशेष पोलिस अधिकाऱ्यांवरच कारवाई केली जाईल - विशेष पोलीस अधिकारी ही नियुक्त फक्त काही दिवसांपुरतीच असेल खरंतर प्रत्येक मुंबईकरांनं कायदा सुव्यवस्था राखून जबाबदारी पार पाडली तर मुंबई पोलिसांसोबतच इतर यंत्रणांवरही  ताण येणार नाही. पण तसं होताना दिसत नसल्यामुळं आता मुंबईकरांमधलेच काही चेहरे विशेष पोलीस अधिकारी बनून इतर मुंबईतकरांना कायद्याचं पालन करायला लावतील. कारण जबाबदार मुंबईकर आता जबाबदार मुंबई पोलिस बनणार आहेत.
Published by:sachin Salve
First published: