• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 'माझा डॉक्टर्स' बनून मैदानात उतरा, मुख्यमंत्री ठाकरेंची आणखी एक अभिनव संकल्पना!

'माझा डॉक्टर्स' बनून मैदानात उतरा, मुख्यमंत्री ठाकरेंची आणखी एक अभिनव संकल्पना!

 2019 च्या निवडणुकीत यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यात संपत्तीच्या माहितीबद्दल तफावत दिसून आली.

2019 च्या निवडणुकीत यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यात संपत्तीच्या माहितीबद्दल तफावत दिसून आली.

'कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्वाची आहे कारण, कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो'

 • Share this:
  मुंबई, 09 मे : कोरोनाविरोधात (Maharashtra Corona cases) लढ्यात महाविकास आघाडी सरकारने (MVA Goverment) 'माझे कुटुंब माझी जबाबदारी', 'मी जबाबदार' या अभिनव संकल्पना राबवून लोकांना कोरोना लढ्यात सहभागी करून घेतले. आता राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी फॅमिल डॉक्टर्संशी संवाद साधून 'माझा डॉक्टर' ही अभिनव संकल्पना सुरू केली आहे. शहरातील हजारो डॉक्टरांना आवाहन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे 700 खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाचवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले. विशेष म्हणजे 3-4  दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने मुंबईतील सुमारे 300 डॉक्टर्सशी संवाद साधण्यात आला होता.  या दोन्ही सभांमध्ये मिळून मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सनी सहभाग घेतला.  केवळ काही डॉक्टर्सशी न बोलता तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोग करून अगदी थेट तळागाळात काम करणाऱ्या शेवटच्या डॉक्टरeशी बोलण्याचा आणि त्यांच्याही सुचना ऐकून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपक्रमाचे वैद्यकीय क्षेत्रात स्वागत होत आहे. अशाच रीतीने राज्यातील इतर विभागातील डॉक्टर्सशी देखील संवाद साधण्यात येणार आहे.  इंडो-पॅसिफिक प्रदेशावर नौदलाची नजर, 6 आण्विक पाणबुड्या तैनात होणार 'कोरोना प्रतिबंधात वैद्यकीय क्षेत्र करीत असलेल्या लढाईसाठी त्यांची प्रशंसा केली तसेच येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्वाची आहे कारण, कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण “माझा डॉक्टर” बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. पोटनिवडणुकीच्या ड्यूटीनंतर शिक्षकासोबत कोरोनाही आला घरी,4 दिवसात कुटुंब उद्धवस्त लक्षणे नसलेले रुग्ण रुग्णालयात जातात आणि आवश्यक नसतानाही त्यांना बेड्स उपलब्ध करून दिले जातात  यामुळे खऱ्या गरजू रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. त्याचप्रमाणे कोविड रुग्ण उशिराने दवाखान्यात जात असल्याने योग्य उपचारांना उशीर होतो, त्यामुळे फॅमिली डॉक्टर्सनी काळजीपूर्वक तपासणी करताना कोविड लक्षणे ओळखून त्याप्रमाणे तत्काळ उपचार सुरू केल्यास वेळीच रुग्ण बरं होण्यास मदत होईल. घरच्या घरी विलगीकरणातील रुग्णांकडे आपण सर्व डॉक्टर्सनी लक्ष देणे, त्यांची विचारपूस करीत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे रुग्णाला मानसिक आधारही मिळतो आणि त्याची तब्येत खालावत असेल तर वेळीच त्याला रुग्णालयात दाखल करणे शक्य होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यासाठी सर्व डॉक्टर्सनी घरी उपचार घेणाऱ्या रुग्णाला प्रोटोकॉलप्रमाणे उपचार मिळताहेत किंवा नाही याकडे व्यक्तिश: लक्ष द्यावे तसंच वॉर्ड अधिकाऱ्यांना देखील योग्य ती माहिती वेळोवेळी दिल्यास रुग्णांच्या बाबतीत पुढील व्यवस्थापन करणे पालिकेला सोपे जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. IPL 2021 : 'या' महिन्यात होणार आयपीएलचे उर्वरित सामने, BCCI चे संकेत आपल्या परिसरातील कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांना देखील आपल्या सेवेची गरज आहे हे लक्षात ठेवून खासगी डॉक्टर्सनी तिथेही आपली नावे नोंदवावी, असे आवाहन  मुख्यमंत्र्यांनी केलं. लहान मुलांकडे लक्ष ठेवा 'तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात ठेऊन राज्यात बालरोग तज्ञांचा एक टास्क फोर्स निर्माण करण्यात येत आहे. याविषयी या सभेत माहिती देण्यात आली तसेच लहान मुलांच्या वातावरणातील बदल, त्यांना होणारी सर्दी, ताप, डायरिया, दुध व अन्न खाणे कमी करणे किंवा बंद होणे अशा लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे', असेही सांगण्यात आले.
  Published by:sachin Salve
  First published: