• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • ‘ट्विटर’च्या फांद्यांवरून उतरून मैदानात या, सेनेचा राहुल गांधींवर निशाणा

‘ट्विटर’च्या फांद्यांवरून उतरून मैदानात या, सेनेचा राहुल गांधींवर निशाणा

महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या काँग्रेस पुढाऱ्यांनीही ‘सामना’ वाचून सोनियांपर्यंत लोकभावना पोहोचवल्या असतील तर चांगलेच आहे'

 • Share this:
  मुंबई, 12 मार्च : 'काँग्रेस (Congress) पक्षाने पुढचा काळ प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करावे. सध्याच्या सरकारविषयी लोकांच्या मानात रोष निर्माण होतोय. बेरोजगारी, अर्थसंकट, महागाई, कोरोनामुळे पडलेल्या प्रेतांचा खच यामुळे केंद्र सरकारची (Modi goverment) लोकप्रियता घसरणीला लागली. अशा वेळी देशभरातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी ‘ट्विटर’च्या (Twitter) फांद्यांवरून उतरून मैदानात उतरणे गरजेचे आहे. सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडणे हे एक महत्त्वाचे काम सर्वच विरोधी पक्षांना रोज करावे लागेल. काँग्रेसने त्या कामी पुढाकार घ्यावा. सोनियांना बहुधा हाच संदेश द्यायचा असावा' असं म्हणत पुन्हा एकदा शिवसेनेनं (Shivsena) काँग्रेसला डिवचले आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं आपल्याच सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कार्यकरिणीच्या बैठकीवरून सल्ला देऊ केला आहे. 'राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यापासून ते रिकामेच आहेत. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याचे मत काँग्रेसमधील ‘जी-23’ गटाने वारंवार मांडले. पक्षाला अध्यक्ष नसल्याने लोकांसमोर कसे जायचे, हा मुद्दा या बंडखोर गटाने उपस्थित केला, पण अध्यक्ष असला नसला तरी पक्ष हा चालतच असतो. जमिनीवरचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा पुढे नेत असतात. एक काळ असा होता की, काँग्रेसने निवडणुकीत दगड उभा केला, तरी लोक त्या दगडास निवडून देत होते. आज चित्र तसे नाही. सोनिया गांधी यांनी कार्य समितीच्या बैठकीत तोच मुद्दा उपस्थित केला. विधानसभा निवडणुकांतील निराशाजनक कामगिरीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. निकाल इतके निराशाजनक आहेत की, पक्षात काही दुरुस्त्या कराव्या लागतील' अशी आठवणच सेनेनं काँग्रेसला करून दिली. नमाज पठणासाठी मशिदीत जाता येणार नाही,'रमजान ईद'निमित्त गृह विभागाकडून सूचना जारी 'महाराष्ट्रातले काँग्रेस पुढारी आपण ‘सामना’ वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात, हे काल पुन्हा दिसून आले. काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही? हा प्रश्न ‘सामना’ने याच स्तंभातून विचारला. नेमका काँग्रेस कार्य समितीत श्रीमती सोनिया गांधी यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. केरळ, आसामातील पराभव त्यांना टोचला व त्यांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या काँग्रेस पुढाऱ्यांनीही ‘सामना’ वाचून सोनियांपर्यंत लोकभावना पोहोचवल्या असतील तर चांगलेच आहे' असं म्हणत सेनेनं काँग्रेसला टोला लगावला. 'काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य लढ्य़ातून लोकांत व देशात रुजला. स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाने अनेक सामान्य कार्यकर्तेही मोठे झाले, पण त्या छोट्याचे नेतृत्व करणारी मंडळी थोर होती. दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, राम मनोहर लोहिया, नाना पाटील हे सर्व एके काळी काँग्रेसचे धुरंधर होते. महाराष्ट्रातील शरद पवार यांनी उभी हयात काँग्रेस पक्षात घालवली. आज अशी माणसे काँग्रेस पक्षात उरली नसतील तर त्यास जबाबदार कोण?  असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला. Smartphone खरेदी करणं आता आणखी महाग होणार; या कारणामुळे वाढणार किमती 'काँग्रेस म्हणजे कधीकाळी स्वातंत्र्य आणि संघर्ष होता. आज राहुल गांधींचा लढा एकाकी आहे. राहुल गांधी हे त्यांचे काम संयमाने करतात. त्यांच्यावर प्रचंड टीका घाणेरड्या शब्दांत होत असताना ते त्यांच्या मुद्यांला धरून लढत राहतात. कोरोना काळात राहुल गांधी यांनी घेतलेल्या अनेक मुद्दय़ांवर सरकार पक्षाकडून टीकेची झोड उठली, पण लसीकरणापासून पुढे इतर अनेक विषयांत सरकारने राहुल गांधींचीच भूमिका स्वीकारली. राहुल गांधी हेच आजही काँग्रेसचे सेनापती आहेत. त्यांचे सरकारवरील हल्ले अचूक आहेत. जगभरातून हिंदुस्थानला जी परदेशी मदत मिळू लागली आहे, त्यावर सरकारची छाती अकारण गर्वाने फुलली तेव्हा त्या फुगलेल्या छातीचा फुगा राहुल गांधी यांनी सहज फोडला. विदेशी मदतीचा गवगवा करणे म्हणजे राष्ट्राभिमान किंवा स्वाभिमान नाही, असे ते म्हणाले व त्यावर राष्ट्रीय मंथन झाले. काँग्रेस पक्षाने पुढचा काळ प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करावे, असंही सेनेनं म्हटलं आहे.
  Published by:sachin Salve
  First published: