S M L

असल्फाच्या झोपड्या झाल्या रंगीबेरंगी!

या झोपड्यांसुद्धा चांगल्या दिसाव्यात म्हणून " चल रंग दे " या संस्थेच्या स्वयंसेवकांनी असल्फा इथल्या टेकड्यांवरील घराच्या भिंती रंगवल्या. या रंगरंगोटीमुळे या ठिकाणचा नूर बदलला.

Sonali Deshpande | Updated On: Jan 12, 2018 01:54 PM IST

असल्फाच्या झोपड्या झाल्या रंगीबेरंगी!

मनोज कुलकर्णी, 12 जानेवारी : मुंबईत एकबाजूला गगनचुंबी इमारती आहेत तर दुसऱ्या बाजूला झोपड्या, यामुळे अनेक ठिकाणी मुंबई बकाल दिसते. या झोपड्यांसुद्धा चांगल्या दिसाव्यात म्हणून " चल रंग दे " या संस्थेच्या स्वयंसेवकांनी असल्फा इथल्या टेकड्यांवरील घराच्या भिंती रंगवल्या. या रंगरंगोटीमुळे या ठिकाणचा नूर बदलला.

झोपड्या म्हटलं की गचाळपणा आणि अस्वच्छता पण काही रंगांनी अशी जादू केली की झोपड्यामधलं सौंदर्य समोर आलंय. मुंबईतील असल्फा इथला रंगवलेला हा प्रदेश मेट्रोतून प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाश्यांचं लक्ष वेधून घेतो आहे.

175 जणांनी या 175 भिंती 2 आठवड्यात रंगवल्या. यासाठी 425 लिटर रंग वापरण्यात आला. या भिंतींवर आहेत. मुंबईची संस्कृती सांगणारी चित्र. या झोपड्यांचं रुपडं बदलण्यासाठी स्थानिकांनीही पुढाकार घेतला होता

असल्फा इथल्या टेकड्यावरील घरं आता फडकं फिरवावं तश्या बदलल्यात. असा रंगीत बदल मुंबईत प्रत्येक भागात व्हावा असंच या रंगीत दुनियेकडे पाहून वाटतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2018 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close