लेफ्टनंट कर्नल पुरोहित जेलबाहेर

लेफ्टनंट कर्नल पुरोहित जेलबाहेर

ले.कर्नल पुरोहित यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार आता पुरोहित कुलाबा डिफेंस युनीटला जाणार आहेत,त्यांच्या जामिनाची प्रक्रीया काल वेळेत पुर्ण न झाल्यानं कालची रात्र त्यांना तळोजा जेलमध्ये काढावी लागली होती.

  • Share this:

मुंबई, 22 ऑगस्ट : 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेप्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित तब्बल 9 वर्षांनी आज तळोजा जेलमधून बाहेर पडले आहेत.  ल. कर्नल पुरोहित यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार  आता पुरोहित  कुलाबा डिफेंस युनीटला जाणार आहेत,  त्यानंतर कोर्टात गेल्यानंतर संध्याकाळी ते  पुण्याला  जातील. त्यांच्या जामिनाची प्रक्रिया काल वेळेत पुर्ण न झाल्यानं कालची रात्र त्यांना तळोजा जेलमध्ये काढावी लागली होती.

जेलबाहेर पडल्यानंतर मी पुण्याला घरी जाणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. 'माझा माझ्या कमांडर्स आणि कमांडवर पूर्ण विश्वास आहे, मी कोणत्याही सरकारला दोष देत नाही, मी माझ्या नशिबाला दोष देतो मी जेलमधून बाहेर पडल्यावर माझ्या सदर्न कमांडच्या मुख्यालयाला भेट देईल, बाहेर काय होतं याचा लष्करावर परिणाम होत नाही, माझा मोठा मुलगा लष्करात भरती होणार आहे', असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. जेलमधून बाहेर पडल्यानंतर माझ्या आईच्या हातचं घरचं जेवण घेण्याची इच्छाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नल पुरोहित हे गेली 9 वर्षे तुरुंगात आहेत. पण त्यांच्याविरोधात सबळ पुरावे आढळून न आल्याचं कारण देत अखेर एनआयएने त्यांच्याविरोधातील मकोका हे कलम काढल्याने सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलाय. दरम्यान, जेलमधून बाहेर पडल्यानंतर लष्कर त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याची शक्यता आहे.

First published: August 22, 2017, 5:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading