शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे हे पहिले अधिवेशन असून विरोधी पक्ष भाजपने सरकारला घेरण्याची तयार केली आहे.

  • Share this:

मुंबई,23 फेब्रुवारी:राज्य मंत्रिमंडळाचे अर्थ संकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे हे पहिले अधिवेशन असून विरोधी पक्ष भाजपने सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे.

शेतकरी कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या,सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे. कर्जमूक्ती संदर्भात राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांची माहिती आमच्यापर्यंत आली आहे. 20 हजार शेतकऱ्यांचे अकाऊंट असतील. हीच यादी उद्या जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील शेतकऱ्यांची यादी जाहीर करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तीन महिन्यांत टप्प्याटप्याने कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

राज ठाकरेंवर 'ते' नागरिक दाखल करणार खटला, 'मिशन बांगलादेशी' मोहिमेचं बुमरँग

उठबस सरकारवर आरोप करणे म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणे नव्हे, सरकारच्या चांगल्याला कामाचे कौतुक करायला शिकावे. विरोधकांच्या सर्वच प्रश्नांना मी उत्तर देत नाही, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले. विरोधाला विरोध करू नये, या सरकारचे हे पहिलंच मोठं अधिवेशन आहे. हे सरकार आता स्थिरावल आहे, हेच विरोधकांना पचनी पडत नाही आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. शिवभोजन योजना चांगल्याप्रकारे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

चीनमध्ये 'कोरोना'चं थैमान; राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले, 'ही तर सर्वात मोठी हेल्थ एमर्जन्सी'

CAA, NRC बाबत भूमिका आधीच मांडली आहे...

CAA, NRC संदर्भात माझी भूमिका 'सामना'मध्ये मी जाहीर केली आहे. मात्र NPR मध्ये काही वेगळं आहे, कारण जणगणनेत काही वेगळं विचारलं जातंय, ते काय आहे हे पाहावं लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले, 'JNU मध्ये जे अतिरेकी घुसले होते. हो मी त्यांना अतिरेकीच म्हणेन त्यांच्यावर कधी कारवाई करणार? कारण दिल्लीची सुरक्षा केंद्राकडेच आहे.

दरम्यान, रविवारी सायंकाळी राज्य मंत्रिमंडळाची 'सह्याद्री' अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार तसेच ज्येष्ठ मंत्र्यांची पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेला उशीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. विरोधकांच्या आरोपांवर अजीत पवार यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले. अधिवेशन सरू होत असताना विरोधक तूर खरेदी करण्यासंदर्भात गैरसमज पसरवत आहेत. जवळपास 306 केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. भातशेती तूर खरेदी पिक हमीभाव या संदर्भात शेतकर्यांच्या मनात गैरसमज परवण्याचं काम विरोधक करत आहेत. येत्या 7 मार्चला अयोध्येत शिवसेनेसोबत जायचं की नाही, त्या दिवसाचे कामकाज बघून निर्णय घेऊ, असे अजीत पवार यांनी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा.. एक वर्षाच्या तान्हुल्याला घेऊन महिला पोलीस कर्तव्यावर

दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारकडून विरोधी पक्ष असलेल्या भाजपला चहापानाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र विरोधी पक्ष भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

First published: February 23, 2020, 8:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading