'शरद पवारांवर ठाकरे सरकार मेहेरबान, संस्थेला दिली 51 हेक्टर जमीन'

'शरद पवारांवर ठाकरे सरकार मेहेरबान, संस्थेला दिली 51 हेक्टर जमीन'

या आधी महसूल, विधी आणि न्याय विभागाने यावर आक्षेप घेतले होते. मात्र हे सर्व आक्षेप धुडकावले आहेत.

  • Share this:

मुंबई 6 फेब्रुवारी : राज्य सरकारने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जागा देण्याचा घेतलाला निर्णय वादात सापडलाय. राज्य सरकारने जालना जिल्ह्यात या संस्थेला 51 हेक्टर जमीन दिलीय. शरद पवार हे या संस्थेशी संबंधित असून त्यामुळेच सर्व नियम डावलून हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केलाय. ठाकरे सरकार हे शरद पवारांवर मेहेरबान झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय.  या संस्थेला जमीन देण्याचा प्रस्ताव हा गेल्या 7 वर्षांपासून प्रलंबित आहे. या आधी महसूल, विधी आणि न्याय विभागाने यावर आक्षेप घेता होता. मात्र हे सर्व आक्षेप धुडकावत सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप होतोय.

मात्र ऊस संशोधनासाठी ही जमीन वापरण्यात येणार असल्याने नियमांना अपवाद करून हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा सरकारकडून केला जातोय. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

यावरून आता राजकारण होत असून भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आली आहे. तर भाजप यावरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. निर्णय न झाल्यामुळे 2017मध्ये ही जमीन महसूल खात्याकडे जमा झाली होती.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलीक यांनीही भाजपचे आरोप फेटाळून लावलेत. संशोधनासाठी ही जमीन वापरणार असून त्यामुळे निर्णयात काहीही चूक नाही असंही ते म्हणाले. या संस्थेचा शेतकऱ्यांना फायदा होईल असंही ते म्हणाले.

First published: February 6, 2020, 11:29 AM IST
Tags:

ताज्या बातम्या