Home /News /mumbai /

रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण

रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण

दोन आठवड्यापूर्वी तेजस ठाकरे यांच्याही दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

मुंबई, 25 जुलै : मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस यांच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकालाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रश्मी उद्धव ठाकरे यांच्या एका सुरक्षा रक्षकालाही कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी या सुरक्षारक्षकाची कोविड 19 चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही पाठीशी, भाजपच्या मोठ्या नेत्याने घेतली इंदुरीकर महाराजांची भेट! हा सुरक्षा रक्षक रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी तैनात होता. दोन आठवड्यापूर्वी तेजस ठाकरे यांच्याही दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांची तब्येत आता बरी असल्याचीही माहिती मिळत आहे. या दोन्ही सुरक्षारक्षकांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांचीही तपासणी करण्यात आली आहे.  केली जाणार असल्याचीही माहितीही दिली जात आहे. या आधीही 'मातोश्री'च्या परिसरात काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. तर खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून स्वत:च गाडी चालवत आपलं काम करत असून त्यांनी ड्रायव्हरला रजा दिली आहे. बुलडाणा हादरलं,3 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; फाशी देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न नेत्यांच्या सुरक्षेसाठी असलेले जवान आणि पोलिसांनाही कोरोना होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. सतत बाहेर राहावं लागत असल्याने सगळी काळजी घेऊन देखील कोरोनाची बाधा होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Shivsena, Uddhav Thackery

पुढील बातम्या