मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र तेजस ठाकरे यांचे नवे संशोधन, शोधली माशांची दुर्मीळ प्रजाती!

मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र तेजस ठाकरे यांचे नवे संशोधन, शोधली माशांची दुर्मीळ प्रजाती!

तेजस ठाकरे हे महाराष्ट्रासह देश-विदेशातल्या जंगलांत फिरून संशोधन करत असतात.

  • Share this:

मुंबई, 16 ऑक्टोबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हे नेहमी दुर्मीळ वन्यजीवांवर संशोधन करत असता. आता तेजस यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगात चौथी नवीन प्रजाती शोधून काढली आहे. आंबोली घाटातील हिरण्यकश नदीत सोनेरी रंगाचे केस असणारा माशांची नवी प्रजाती तेजस ठाकरे यांनी शोधली आहे.

विशेष म्हणजे, या माशाची ही 20 वी प्रजाती आहे आणि तेजस ठाकरे यानी शोधलेली चौथी प्रजाती आहे. या आधी त्यांनी सह्याद्रीच्याच पर्वत रांगात पालींच्या दुर्मीळ प्रजाती शोधुन काढल्या होत्या. तेजस ठाकरे यांना आंतरारष्ट्रीय स्तरावरील जीवशास्त्र मासिकांनीही प्रसिद्धी देऊन मान्यता दिली होती.

View this post on Instagram

It gives me immense joy in announcing the discovery of this stunning fish - Schistura hiranyakeshi sp. nov. (Hiranyakeshi loach), a jewel from the heart of the Sahyadris in Maharashtra, published in ‘Aqua, International Journal of Ichthyology’! Endemic to its type locality, the 'kund' at the ancient Hiranyakeshvar temple, where the mighty Hiranyakeshi river originates. It is near the quaint town of Amboli, a hotspot for new discoveries across multiple taxas, with this fish being the 20th new species (and my 4th) to be described from this tiny town in Sindhudurg district since 2005! We have named this species after it's type locality and the ephitet "hiranyakeshi" in Sanskrit also means 'golden hair' alluding to the brilliant golden colouration seen in adults. Leading the paper is Dr. Praveenraj Jayasimhan, a young and extremely passionate ichthyologist, whom I have been working closely with since the past year, Along with Mr. Shankar Balasubramanian, an explorer & underwater photographer traveling across India documenting our incredible freshwater fish diversity and their shrinking habitats for the past 18 years! I hope you enjoy this stunner & have a good weekend ahead. #westernghats #sahyadris #freshwaterfish #maharashtra #taxonomy #novataxa #ichthyology #loach #schistura #amboli @praveenrajjayasimhan @shankar.balasubramanian

A post shared by Tejas Thackeray (@tuthackeray) on

आता हिरण्यकश नदीत शोधलेल्या या नव्या प्रजातीच्या माशाचं नाव 'हिरण्यकेशी' असं ठेवण्यात आले आहे. याचा संस्कृत अर्थ सोनेरे रंगाचे केस असणारा असा आहे. माशाच्या या नवीन प्रजातींना शोधण्यासाठी तेजस ठाकरे यांना अंडर वाँटर फोटोग्राफर शंकर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर प्रविणराज जयसिन्हा यांचे सहकार्य मिळालं.

तेजस ठाकरे हे महाराष्ट्रासह देश-विदेशातल्या जंगलांत फिरून संशोधन करत असतात. याआधी त्यांनी खेकड्यांच्या आणि पालीच्या प्रजातींचा शोध लावला होता. ऑगस्ट महिन्यात तेजस ठाकरे यांनी राज्य सरकारकडे संशोधनाबाबत एक प्रस्ताव पाठवला होता. वन्यजीव संरक्षण कलमानुसार संरक्षित क्षेत्रात काही काम करायचे असेल तर त्यासाठी  वन्यजीव मंडळाची मान्यता लागत असते. त्यानुसार तेजस ठाकरे, अनिकेत मराठे, स्वप्नील पवार, अमृत भोसले यांनी हा प्रस्ताव वन्यजीव मंडळाकडे पाठवला होता. त्यांच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वन्यजीव मंडळाची 15 वी बैठक पार पडली आणि संशोधनाला मंजुरी देण्यात आली होती.

विशेष म्हणजे, एका प्रजातीला त्यांनी ठाकरे कुटुंबीयांचे नाव दिले आहे. गॅटीएना पत्रोपर्पर्रीया, गॅटीएना स्पेंडिटा, गुबरमॅतोरिएना एग्लोकी, गुबरमॅतोरिएना वॅगी आणि भगव्या रंगाचा गुबरमॅतोरिएना थॅकरी अशी या खेकड्यांच्या प्रजातींची नावे आहेत. भगव्या रंगाचा गुबरमॅतोरिएना थॅकरी हे नाव ठाकरे आडनावावरून दिली आहे.

Published by: sachin Salve
First published: October 16, 2020, 9:45 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading