मुंबई, 17 जून : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Government)कायम संघर्ष पाहण्यास मिळाला. पण, आज राजभवनात(Rajbhavan) एका वेगळेच चित्र पाहण्यास मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा दीड वर्ष संघर्ष असला तरी महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीचा वारसा जपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राजभवनावर पोहोचले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
अभिनेत्रीनं सलमान खानसाठी वाढवलं होतं वजन; लठ्ठपणामुळंच केलं जातं ट्रोल
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष सिंग आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित आहेत.
राज्यपालांकडेच 12 आमदारांची यादी!
विशेष म्हणजे, गेल्या आठ महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा (MLAs appointed by Governor) मुद्या प्रलंबित असल्यामुळे महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये वाद पेटलेला आहे. मध्यंतरी यादी गहाळ झाल्याची माहिती समोर(RTI) आली होती. पण, ही यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीयांच्याकडेच असल्याची माहिती समोर आली आहे.
साधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषद सदस्य नेमणूक करण्यासाठी ज्या 12 जणांची नावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली होती. ती यादी माहिती अधिकारात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली होती. 15 जून रोजी राजभवन सचिवालयात याबाबत अनिल गलगली यांनी दिलेल्या आव्हान अपिलावर झालेल्या सुनावणीत ती यादी राज्यपालाने स्वतःकडे ठेवली असल्याचे सांगण्यात आले. आता राज्यपालांने निर्णय घेतल्यावरच माहिती मिळेल, असं सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.