मुंबई, 08 ऑगस्ट : राज्यात कोरोनाची (maharashta corona case) लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथील करण्यात आले आहे. मात्र, मुंबईची लोकल, सिनेमागृह आणि मंदिर अद्यापही बंदच आहे. त्यामुळे निर्बंध आणखी शिथिल व्हावे, अशी मागणी होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी जनतेशी संवाद साधत किती लाटा येतील हे सांगता येणार नाही, अशी भीती उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत त्यांनी खुलासा केला.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आहे. अशा कोरोनाच्या किती लाट किती येतील हे सांगू शकत नाही. १५० वर्षांची ब्रिटिशांची जशी गुलामगिरी आपण उधळून लावली, तशीच कोरोनाची लाट उलथवून लावायची आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
पावसाळ्याची सुरुवात या ही वेळी अस्मानी संकटाने झाली. निसर्ग चक्रीवादळ आले. आता याही वर्षी कोकणात भीषण पाऊस झाला. ढगफुटी झाली. वेधशाळेनं इशारा दिला होता. पण एकाच दिवसात चार महिन्यांचा पाऊस झाला. या संकटात सरकारने चांगलं काम केलं. या संकटातून ४ लाखांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
पण दरडी कोसळल्यामुळे गावाच्या गाव नाहीशी झाली. दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहे. ओडीशामध्येही दरडी कोसळत आहे. हा ग्लोबल वार्मिंगचा फटका आहे. मुख्यमंत्री कुठे दौऱ्यावर आले ही पॅकेजची घोषणा करतात अशी परंपरा होती. पण, मी तशी कोणतीही घोषणा केली नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचे सर्व मंत्र्यांनी पाहणी केली, बैठक घेऊन ११ हजार ५०० कोटींची घोषणा केली. मदत आता सुरू केली आहे. लाँग टर्मसाठी नियोजन सुरू झाले आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
उद्या टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक
दरम्यान, राज्य सरकारनं 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले आहे. मात्र, पुढील दोन महिने धोक्याचे असल्याचं मत राज्याच्या टास्क फोर्सनं (Task Force) व्यक्त केलं आहे. अशातच उद्या कोविड टास्क फोर्सची बैठक (Meeting) होणार आहे.
या बैठकीत मुंबई लोकल सुरू करण्यासंदर्भात निर्णय अपेक्षित आहे. सामान्य मुंबईकरांना लोकल ट्रेन मधून प्रवास करायला मिळणार का याकडे सगळ्यांच लक्ष आहे. दोन लस डोस पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवास मुभा द्यावी ही मागणी केली जात आहे. त्यामुळे टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हॉटेल व्यावसायिकांना देखील वेळ वाढवून हवी आहे. राज्यातील कोरोना रुग्ण संख्या आणि विविध भागात काय सूट दिली जाऊ शकते याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे उद्या होणार टास्क फोर्सची बैठक महत्वाची असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.